पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थसंकल्पामध्ये २ हजार कौशल्यविकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. त्यामाध्यमातून तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. या रोजगार मेळाव्यात ५५ हजार पद अधिसूचित करण्यात आली आहेत. आतापर्यंत ३६ हजार अर्ज आले असून प्रत्येकाला कौशल्याप्रमाणे रोजगार मिळतील, अशी अपेक्षा उपमुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थीतीत आज बारामतीतील नमो रोजगार मेळावा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, चांगल्या कामाल एकत्र येण्याची आपली संस्कृती आहे. तरूणांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. चांगले काम करत राहिला तर आयुष्यभर प्रगती होईल. पहिला रोजगार मेळावा नागपूरला पार पडला. तेथे ११ हजार तरूणांना रोजगार मिळाला. ५० हजार पर्यंतचे पॅकेजेस मिळालीत. या मेळाव्यातूनही तरूणाईला मोठ्या रोजगार संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा :