Latest

धोक्‍याचा इशारा..! शॅम्‍पू करु शकतो ‘लिव्‍हर’ खराब ! जाणून घ्या नवीन संशोधन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही वर्षांमध्‍ये केसांचे सौंदर्य म्‍हटलं कोणता शॅम्‍पू वापरता, हा प्रश्‍न सर्वसामान्‍य झाला आहे. जीवनावश्‍यक वस्‍तू ठरावी असा शॅम्‍पूचा आपल्‍या जगण्‍यात शिरकाव झाला आहे. मात्र नवीन संशोधन तुम्‍हाला सातत्‍याने शॅम्‍पूचा वापरापासून सावध करत आहे. जाणून घेवूया 'जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित केलेल्या नवीन संशोधनाविषयी…

शॅम्‍पूमधील रासायनिक संयुगे ठरतात घातक

मागील दोन दशकांमध्‍ये शॅम्‍पू हा भारतातील अत्‍यंत झपाट्याने वाढणार्‍या उद्योगपैकी एक झाला आहे. यामध्‍ये दरवर्षी सुमारे सहा टक्‍के एवढी वाढ होत आहे. मात्र केसांची काळजी घेणारी उत्पादने वारंवार वापरणाऱ्यांसाठी आता एक इशारा देण्‍यात आला आहे. संशोधकांनी दावा केला आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश शॅम्‍पूमध्‍ये मोठ्या प्रमाणात रासायनिक संयुगे असतात. याचा परिणाम थेट मानवी लिव्‍हर (यकृत) होवू शकतो.

श्वसनमार्ग, यकृत आणि मज्जासंस्थेवर परिणाम

'जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे की, केसांची निगा राखण्‍यासाठीच्‍या शॅम्‍पू या उत्पादनांमधील असणारी रसायने ही हवेत आवश्यकतेपेक्षा जास्त काळ राहतात. या घातक रसायनांचा मानवाच्‍या श्वसनमार्ग, यकृत आणि मज्जासंस्थेवर परिणाम होण्‍याची शक्‍यता असते.

काही रसायने श्वास घेण्यासही धोकादायक

अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, घरामध्ये केसांच्या निगा राखण्यासाठी वापरण्‍यात आलेल्‍या उत्‍पादनामधये एका सत्रात एक व्यक्तीच्‍या शरीरात 17 मिलीग्राम संभाव्य हानिकारक रसायने जातात. शॅम्‍पूमधील अनेक उत्पादने सुगंधित देखील आहेत. हे सुगंध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही रसायने श्वास घेण्यासही धोकादायक असतात, असेही दावा संशोधनांनी केला आहे.

शॅम्‍पूमध्‍ये वापरण्‍यात येणारे डेकामेथिलसायक्लोपेंटासिलॉक्सेन किंवा डी5 सिलोक्सेन ही रसायने मानवी शरीरावर माहित नसलेल्यापेक्षा जास्त चिंताजनक असू शकतात, असा इशाराही लायल्स स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंगमधील सहाय्यक प्राध्यापक नुसरत जंग यांनी दिला आहे. केसांची निगा राखण्‍यासाठीची जेल, तेल, क्रीम आणि स्प्रे यासारख्या "लिव्ह-ऑन" उत्पादनांचा या अभ्‍यासात समावेश नाही, असेही त्‍या स्‍पष्‍ट करतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT