Latest

young population : देशातील निरागस बालपण हरवतंय, पण जवानी वाढत चाललीय !

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो.मिळालेल्या माहितीनुसार देशातील १५ वर्षाखालील मुलांची संख्या घटत चालल्याचे समोर आले आहे, पण तरुणांची लोकसंख्या वाढत चालली आहे.  (young population)

१९७१ साली भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ४१.२ टक्के १५ वयोगटातील मुले होती. ती २०१९ मध्ये घटून २५.३ टक्के झाली आहे १९७१ त्या तुलनेत १५.९ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.

या कालावधीत १५ ते ५९ वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी वाढली आहे. या १९७१ साली वयोगटातील ५३.४ टक्के लोकसंख्या होती. जी २०१९ मध्ये वाढून ६६.७ टक्के इतकी झाली आहे. त्याचबरोबर वृद्धांचा म्हणजेच ६० वर्षांवरील लोकांची संख्या ही वाढली आहे. एकूण लोकसंख्येतील वृद्धांचा वाटा १९७१ मधील ५.३ टक्क्यांवर होता तो सध्या ८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

young population : भारतातील सर्वात तरुण आणि वयस्कर व्यक्तीं असलेली राज्ये

बिहार, मध्य प्रदेश आणि झारखंड ही देशातील सर्वात तरुण राज्ये आहेत. २०१९ मध्ये, झारखंड आणि मध्य प्रदेशातील ३३.५ टक्के आणि २९.१ टक्के लोकसंख्या ही १५ वर्षांपेक्षा कमी वयाची संख्या असलेली मुले आहेत. तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये ही लोकसंख्या सर्वात कमी आहे.

केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे १२.९ टक्के आणि ११.३ टक्के वयस्कर व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. तर तेलंगणातील लोकसंख्येच्या ७१.९ टक्के वर्ग हा कार्यरत आहे. तसेच हा आकडा बिहार आणि उत्तराखंडमध्ये सर्वात कमी आहे.

young population : जन्मदरातील लिंग असंतुलनात स्थिरता

२००९-११ आणि २०१७-२०१९ या कालावधीत जन्मदरात मुली आणि मुलांमधील असमतोलात लक्षणीय फरक पडलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

२१ वर्षांखालील महिलांच्या विवाहाचे प्रमाण कमी होत आहे

केंद्र सरकार मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी कायदा आणणार आहे. तसे पाहता २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या लग्नाचे प्रमाण घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. २१ वर्षांखालील सर्वाधिक मुलींचे लग्न झालेल्या राज्यांच्या यादीत पश्चिम बंगाल पहिल्या स्थानी आहे.

2019 मध्ये पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांनी निम्म्याहून अधिक मुलांना जन्म दिला

२०१९ मध्ये, ५१.९ टक्के मातांनी बाळांना जन्म दिला, याचबरोबर २०१९ मध्ये जन्मलेल्या बाळांपैकी ११.७ टक्के अपत्ये त्यांच्या आईचे तिसरे अपत्य होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT