Latest

कोल्हापूर : सामना पाहून येताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील फुटबॉल सामना पाहून घराकडे परतत असताना रस्त्यावर हृदयविकाराचा धक्का येऊन तरुणाचा मृत्यू झाला. रितेश किरण माळी (वय 20, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दोन्ही संघादरम्यानचा सामना पाहात असताना त्याच्या छातीत दुखत होते. मित्रांनी त्यास तत्काळ दवाखान्यात जाण्यास सांगितले.

सामना स्थगित झाल्यानंतर तो घराकडे जात होता. वाटेतच त्याला हृदयविकाराचा धक्का आला. रस्त्यावर कोसळताच मित्रांनी त्यास सीपीआरमध्ये हलविले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मनाला चटका लावणार्‍या या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT