Latest

योगी आदित्यनाथ यांची आज सांगलीत सभा

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा बुधवारी (1 मे) दुपारी तीन वाजता सांगली येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यासह परिसरातील लाखोंचा जनसागर उसळणार आहे, अशी माहिती भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी दिली.

ढंग म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. जिल्हाभरात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा सांगलीत होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी सुरक्षा यंत्रणांनी सभास्थळाची पाहणी केली. पोलिस प्रशासनाने सभेसाठी कडेकोट सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव, मिरज या सर्व भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत. त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यांतील कार्यकर्तेही या सभेला येणार आहेत. सभेला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन ढंग व पाटील यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT