Latest

Yezdi : बुलेटला टक्कर देणारी येझडी लॉन्च, बुलेटपेक्षा हजारो रुपये स्वस्त

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९७० च्या दशकातील तरुणांची आवडती क्लासिक बाइक, येझडी पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी बाजारात येत आहे. महिंद्राच्या मदतीने Yezdi बाइकचे ३ मॉडल लाँच झाले आहेत. Yezdi Adventure, Yezdi Scrambler आणि Yezdi Roadster अशी ही मॉडेल आहेत.

येझडी रोडकिंगमध्ये ३३४cc चे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. यापुर्वी जावाच्या पेराक या वाहनामध्ये सिंगल सिलिंडर ३३४ सीसी इंजिन वापरण्यात आले आहे.

हे इंजिन ३० bhp कमाल पॉवर आणि ३२.७४ Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यामध्ये कस्टमर्सना ६-स्पीड गिअरबॉक्स सुविधा देण्यात आली आहे. एवढेच नाही तर या मोटरसायकलला समोर २१-इंच स्पोक व्हील आणि मागील बाजूस १७-इंच व्हील देण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेकही असणार आहेत. येझडीची किंमत १.६० लाखांपासून सुरू होणार आहे.

Yezdi : ८० चे दशक गाजवणारी गाडी बाजारात

येझडी १९६० च्या उत्तरार्धात भारताच्या बाजारात आल्या, या बाईक्सना लोकांनी चांगलीच पसंदी दिली. १९९० च्या दशकापर्यंत भारतात या वाहनाची चांगलीच क्रेझ होती. येझडीची अष्टपैलू बाइक ओळख होती.

यामध्ये येझडीला रोडकिंग, क्लासिक, CL II, मोनार्क अशा विविध प्रकारात या बाईक्स उपलब्ध असायच्या. भारतात येझडी बाइक्सची एक वेगळीच क्रेझ आहे, अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठ्या कलाकारांनी याचा वापर केला आहे.

रॉयल एनफिल्डला टक्कर देणार

ही बाईक लॉन्च केल्यानंतर, तिची थेट स्पर्धा रॉयल एनफिल्ड ३५० सोबत होणार आहे. रॉयल इनफिल्ड बुलेटची मुळ किंमत सध्या २ लाखांपासून सुरू होते.

जुन्या आणि नवीन येझडीमध्ये काय आहे फरक?

क्लासिक लेजेंड्सने पूर्वीचा झेक ब्रँड – जावा पुन्हा एकदा लोकांमध्ये आणून भारताला एक नवीन ओळख दिली आहे. इतकेच नाही तर कंपनीने यूके स्थित BSA मोटरसायकल ब्रँडचा देखील त्यात समावेश केला. जुन्या आणि नवीन येझदी बाइक्समध्ये काही समानता आढळल्या आहेत. दरम्यान कंपनीने स्पेसीफिकेशनबाबत कोणताही खुलासा केला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT