Latest

Yearly Horoscope 2024 : मीन, वार्षिक भविष्य २०२४ : संमिश्र अनुभवाचे, गुरुकृपेचे वर्ष

सोनाली जाधव

मीन रास पूर्वार्धात लाभ, वर्ष विपरीत राजयोगाचे – गुरुकृपेचे. राशीस्वामी गुरू व नेपच्यून, जलतत्त्व, द्विस्वभाव, बोधचिन्ह – एकमेकांचे पुच्छ पकडण्यासाठी गोलाकार फिरणारे दोन मासे, स्त्री राशी. (Yearly Horoscope 2024)

गुरू-नेपच्यून या राशीच्या व्यक्तींना अतिशय संवेदनशीलता देतात. या राशीच्या लोकांना इतर राशीपेक्षा जास्त कृपा लाभते. कालपुरुषाच्या कुंडलीतील भाग्य व मोक्ष स्थानाचा स्वामी गुरू आहे. या व्यक्तींना आध्यात्मिक श्रेष्ठत्व कमी तपश्चर्येने प्राप्त होते.या वर्षात गुरु-हर्षल मेपर्यंत तुमच्या राशीच्या धनस्थानी मेषेत असेल. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असेल पण शनिदृष्टीमुळे, साडेसातीमुळे अपेक्षित एवढी प्राप्ती होणार नाही. (Yearly Horoscope 2024)

दशमेश गुरू धनस्थानी असल्यामुळे सरकारी कामाचे पैसे मिळतील. विवाह जुळेल. नवीन रोजगार मिळेल. कर्जफेडीमुळे हातात पैसे कमी मिळतील. एक मेनंतर गुरू व जूननंतर हर्षल वृषभेत राशीच्या वृत्तीयस्थानी येतील. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. विवाह जुळतील. प्रयत्नवादी राहाल. वर्षभर शनि मूळ त्रिकोण कुंभ राशीत राहील. खर्च झाला तरी योग्य कारणासाठी खर्च करण्याकडे प्रवत्ती राहील. पण खर्च वाढेल. नेत्रविकार जाणवेल, प्रगतीच्या कामात अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल. कौटुंबिक समस्या जाणवतील.

वर्षभर प्लुटो राशीच्या लाभ स्थानात राहील. मोठ्या प्रोजेक्टमधून भरपूर आर्थिक लाभ होईल, पण साडेसातीमुळे मोठ्या षड्यंत्रात अडकू शकाल याचे भान ठेवा. वर्षभर नेपच्यून व राहू हे मीन राशीत असतील, संवेदनशीलता व गाफीलपणा, आक्रमकता अशा विचित्र चक्रात अडकाल. भावनेपोटी टोकाचे निर्णय घेऊ नका. सप्तमातील कन्या राशीतील केतूमुळे भावनिक दडपण येईल. मंगळाच्या कुंभ, मीनेतील भ्रमणात भावनिक दडपण प्रचंड वाढेल. प्रसंगी दोन पावले मागे येण्याने, क्षमाशील राहण्याने अनर्थ टळू शकतात. मिथुनेत (ऑगस्ट, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये) मंगळ असताना पोटाची तक्रार जाणवेल. कर्केत (ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये) मंगळ आल्यावर जवळच्या व्यक्तींना दुखवू नका.

शुक्र – सिंह – कन्येत (ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये) असताना स्पर्धकांचा अंदाज घ्या. गुप्त कारवायांचा त्रास जाणवेल. वर्षाच्या सुरुवातीला शुक्र धनूत (जानेवारी – फेब्रुवारी) असताना धंद्यात नुकसान होणे शक्य आहे. पण सामाजिक कार्यातून लाभही होऊ शकेल रवि राशीच्या तृतीयस्थानी वृषभेत (मे– जून) असताना विकास योजना राबवाल. रवि षष्ठस्थानी सिंहेत (ऑगस्ट-सप्टेंबर) असताना कमी श्रमात संधी चालू येईल. रवि धनु-मकरेत (जाने-फेब्रुवारी) वर्षाच्या सुरुवातीला असताना बढती मिळू शकेल. धंद्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतील. पण अधिकार अपेक्षेप्रमाणे चालणार नाहीत. गुप्तशत्रू असतील.

रवि वृषभेत (मे-जून) असताना गृहसौख्याची काळजी राहील. रवि तुळेत (ऑक्टोबर-नोव्हेंबर) असताना धंद्यात मंदी जाणवेल. शारीरिक दगदग जाणवेल. पण तुमच्यावरचा लोकांचा विश्वास कायम राहील. या काळात शुक्र तुळेत (सप्टेंबर-ऑक्टोबर) असताना अचानक मोठे धनलाभ होतील. विपरीत घटनेतून लाभही होईल.

रवि कुंभेत वर्षाच्या सुरुवातीला (फेब्रुवारी- मार्च) असतानाही विपरीत घटनेतून लाभ होईल. पण धंद्यात मोठी स्पर्धा जाणवेल. थोडक्यात वर्षाचा पूर्वार्ध प्रगतीकारक राहील. वर्ष संमिश्र अनुभवाचे. विपरीत घटनेतून लाभ करून देणारे आहे. एकंदरीत हे वर्ष संमिश्र अनुभवाचे, विपरीत राजयोगाचे गुरुकृपेचे वर्ष राहील.

चंद्रबल (तारखा)

  • जानेवारी- १२,१६,१७,२१,२२,३०,३१,
  • फेब्रुवारी- १,१४,१६, २४,२५,२६, २७,२८,
  • मार्च- १५,१६,२२,२३,२४,२५,२६,
  • एप्रिल- १३,१९,२०,२२,२३,२७,२९,
  • मे- १६,१७,१८,१९,२०,२६,२७,२८,
  • जून- १२,१४,१६,२२,२४,२५,
  • जुलै-११,१३,१४,१९,२०,२१,२२,२३,
  • ऑगस्ट – १०,१६, १७,१८,१९,२२,२३,
  • सप्टें-१२,१३,१४,१५,१८,१९,२२
  • ऑक्टोबर- ९,११,१३,१६,१७,२१,२३,
  • नोव्हेंबर – ७,८,९,१२,१३,
  • डिसेंबर- १०,११,१४,१५,२०,२४
SCROLL FOR NEXT