Latest

नवरात्र : २६ वर्षांपासून छातीवर २१ कलश ठेवून देवीची आराधना!

Arun Patil

पाटणा : नवरात्रीच्या काळात अनेक लोक कडक नियम पाळून देवीची उपासना करीत असतात. बिहारमध्ये तर एक असे भक्त आहेत जे गेली 26 वर्षे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळात छातीवर 21 कलशांची उतरंड ठेवून पहुडलेले असतात. पाटण्याच्या पुनाइचाक येथील नौलखा मंदिरात नागेश्वर बाबा नावाचे हे भक्त अशी देवीची आराधना करतात.

घटस्थापनेच्या दिवशी यंदाही त्यांनी छातीवर विधीवत हे कलश ठेवले जे नवमीला हवन केल्यानंतर काढले जातात. या नऊ दिवसांमध्ये ते काहीही खात-पीत नाहीत व जागेवरून उठत नाहीत. वयाच्या 36 व्या वर्षापासून आपण ही साधना करीत आहोत असे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात ते छातीवर एक कलश ठेवत असत. त्यानंतर कलशांची संख्या वाढत गेली आणि आता ते 21 कलश छातीवर ठेवतात. त्यांचे एकूण वजन सुमारे 50 किलो आहे. विशेष म्हणजे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला तहान-भूकेची किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची जाणीव होत नाही, असे ते सांगतात. छातीवर कलश ठेवण्यासाठी नागेश्वर बाबा घटस्थापनेच्या आधी दोन दिवसांपासूनच खाणे-पिणे बंद करतात. दशमीपर्यंत ते मातेची आराधना करतात व एकादशीला उपवास सोडतात.

SCROLL FOR NEXT