Latest

World Sparrow Day : कृत्रिम घरटे, झुडूपवर्गीय झाडांनी चिमण्यांचे संवर्धन शक्य; विविध उपक्रमांची साजरा

अनुराधा कोरवी

किणी; राजकुमार चौगुले : चिमण्यांची घटती संख्या मानवी जीवणाबरोबर पर्यावरणालाही घातक ठरणार आहे. यासाठी विविध पध्दतीने चिमण्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहन निसर्गप्रेमी मित्र संस्थेकडून करण्यात आले. (World Sparrow Day )

संबंधित बातम्या 

दिनांक २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा केला जातो. सिमेंटची घरे, शहरीकरण, कीटकनाशकांचा वापर, वृक्षतोड, प्रदूषण यामुळे चिमण्यांच्या संख्येत घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गप्रेमी मित्र संस्था पेठ वडगाव आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून भादोले आणि पेठ वडगावमध्ये चिमणी गणना तसेच कृत्रिम घरटे, मातीचे पाणी पात्र वाटप करून चिमण्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सकाळी पेठ वडगावमधील चावडी परिसरात आदर्श गुरुकुल शाळेचे विद्यार्थी, निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्या सदस्यांनी चिमण्यांची गणना तसेच चिमण्यांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना कृत्रिम घरटी, मातीची भांडी वाटण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक नागरी भागात चिमण्या पाहून अचंबित झाले. नैसर्गिक आधिवास, झडूप वर्गीय झाडे यामुळे ही संख्या आजतरी अबाधित आहे. मात्र, सिमेंटची घरे झाल्यास चिमण्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील निसर्ग प्रेमी मित्र संस्था गेल्या ५ वर्षापासून जागतिक चिमणी दिवस साजरा करत आहे.

गेल्या वर्षी कृत्रिम घरट्याचे वाटप केलेल्या परिसरात चिमण्या दिसून येत आहेत. ही एक निसर्ग प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. या उपक्रमात निसर्गप्रेमी मित्र संस्थेचे डॉ. अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. निलेश ढोबळे, डॉ. विशाल पाटील, ग्रामसेवक नंदकुमार थोरवत, बाजीराव माळी, अनिल पाटील, राजेंद्र भोसले, आदर्श गुरुकुलच्या शिक्षिका वर्षा पाटील आदींनी सहभाग घेतला. आदर्श गुरुकुल विद्यालयात पक्षी अभ्यासक डॉ. अमोल पाटील यांचे 'चला चिमण्या जपूया' या विषयावर प्रेझेंटेशन द्वारे चिमणीबद्दल सखोल माहिती तसेच चिमण्या संवर्धनाचे धडे देण्यात आले. डॉ. नीलिमा पाटील यांनी चिमण्यांची गाण्यांचे गायन केले. ( World Sparrow Day )

निसर्गप्रेमीकडून आवाहन
अंगणात चिमण्या येण्यासाठी काय कराल
•झुडूपवर्गीय झाडे लावा
• बांबू, पाइप पासून बनविलेले कृत्रिम घरटे लावा
•अंगणात, बागेत मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवा.
• कीटकनाशके वापरू नका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT