Latest

World Rose Day : व्हॅलेंटाईन डे’ वीक मधील ‘रोज डे’ पेक्षा आजचा ‘रोज डे’ का वेगळा आहे, जाणून घ्या

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रोज डे' म्हटलं की, तुम्हाला  'व्हॅलेंटाईन डे' वीक आठवतो. 'व्हॅलेंटाईन डे' वीक मधील 'रोज डे' प्रमाणे सप्टेंबरच्या २२ तारखेला सुद्धा 'रोज डे' (World Rose Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील खास पार्श्वभूमी आहे. पाहूया  'व्हॅलेंटाईन डे' वीक मधील 'रोज डे' पेक्षा आजचा 'रोज डे' का वेगळा आहे.

२२ सप्टेंबरला 'वर्ल्ड रोज डे' साजरा केला जातो. ज्यांना कॅन्सर झाला आहे. अशा लोकांना गुलाब देवून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना जगण्याविषयी उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा दिवस कॅनडामधील मेलिंडा रोजच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

World Rose Day : कोण आहे मेलिंडा रोज?

मेलिंडा रोज ही कॅनडामधील १२ वर्षीय मुलगी. बालपणातच तिला कॅन्सरचा सामना करावा लागला. तिला 'अस्किन ट्युमर' हा ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी ती जास्तीत-जास्त दोन महिनेच जगु शकेल असे सांगितले होते; पण तिने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तीने सहा महिने कॅन्सरशी झूंज दिली. सप्टेंबर महिन्यात तिने अखेरचा श्वास घेतला.

World Rose Day

या सहा महिन्यात तिला आजुबाजूच्या लोकांनी तिला आनंदी ठेवणारे संदेश दिले. कविता पाठवल्या. तिच्या आजुबाजूचे वातावरण नेहमी आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील राहिले. मेलिंडानेही कॅन्सरग्रस्त लोकांना कविता, सकारात्मक संदेशपर पत्र लिहून त्यांच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. मेलिंडाच्या निधनानंतर कॅन्सरशी निकराने झुंज दिल्याबद्दल आणि इतर रुग्णांना जगण्याची उमेद दिली याबद्दल तिच्या गौरवाप्रीत्यर्थ तिच्या मृत्यूनंतर २२ सप्टेंबर रोजी जागतिक रोज डे साजरा केला जातो.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT