Latest

तंबाखू पिकाची लागवड कमी करा, जागतिक आरोग्य संघटनेने दिला जगाला इशारा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तंबाखूच्या पिकामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत असून, या पिकाची लागवड कमी करा, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. 'आम्हाला अन्न हवे, तंबाखू नव्हे' ही यंदाची थीम जगाला देण्यात आली आहे.

संपूर्ण जगात 31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील सार्वजनिक आरोग्य संघटना एकत्र येतात. 2023 च्या जागतिक मोहिमेचे उद्दिष्ट तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यायी पीक उत्पादन आणि विपणनच्या संधींबद्दल जागरूकता वाढविणे आणि त्यांना शाश्वत, पौष्टिक पिके घेण्यास प्रोत्साहित करणे आहे. तंबाखू उद्योगाच्या तंबाखूला शाश्वत पिकासह बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश करणे, ज्यामुळे जागतिक अन्न संकटाला हातभार लावणे, हे देखील त्याचे उद्दिष्ट असेल, असेही जागितक आरोग्य संघटनेने दिलेल्या संशोधनात्मक संदेशात म्हटले आहे.

3.5 दशलक्ष हेक्टर जमीन तंबाखूसाठी

जगभरातील सुमारे 3.5 दशलक्ष हेक्टर जमीन दरवर्षी तंबाखू पिकासाठी बदलली जाते. तंबाखूच्या वाढीमुळे दरवर्षी दोन लाख हेक्टर जंगलतोड होते. त्यासाठी कीटकनाशके आणि खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो, ज्यामुळे मातीचा र्‍हास होतो. तंबाखूमुळे जमिनीची सुपीकता कमी होते.

तंबाखूमुळे होतेय वाळवंटीकरण

इतर पिकांच्या तुलनेत तंबाखूच्या शेतीचा अधिक विध्वंसक प्रभाव पडतो. कारण, तंबाखूच्या शेतजमिनी वाळवंटीकरणास अधिक प्रवण असतात. नगदी पीक म्हणून तंबाखूपासून मिळणारा कोणताही नफा कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये शाश्वत अन्न उत्पादनाला झालेल्या नुकसानाची भरपाई करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर तंबाखूचे उत्पादन कमी करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची आणि शेतकर्‍यांना पर्यायी अन्नपिकांच्या उत्पादनात मदत करण्याची नितांत गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT