Latest

World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी द. आफ्रिका-ऑस्ट्रेलियाला धक्का! ‘हे’ खेळाडू मायदेशी परतले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरु होण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 5 ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार असून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. जगभरातून संघ भारतात दाखल झाले आहेत. काही वगळता, सर्व 10 सहभागी संघांचे खेळाडू आणि इतर सदस्य सध्या भारतात आहेत. 29 सप्टेंबरपासून सराव सामनेही सुरू होतील. मात्र यादरम्यान दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांना मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा मायदेशी परतला

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा भारतात आल्यानंतर अचानक आपल्या देशात परतल्याचे वृत्त आहे. त्याच्या परतण्याचे कारण स्पष्टपणे समजू शकले नाही, परंतु काही कौटुंबिक कारणांमुळे त्याला मायदेशी जावे लागले आहे. याचाच अर्थ टेंबा बावुमा यापुढे आपल्या संघासाठी सराव सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे एडेन मार्कराम आता सराव सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत. द. आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल तोपर्यंत तो भारतात परत येईल असे सांगितले जात आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पूर्ण वेळापत्रकात दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळताना दिसणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सामना सुरू होईपर्यंत टेंबा बावुमा परतणार असला तरी काही कारणांमुळे तो परत आला नाही तर संघासमोर मोठी अडचण निर्माण होईल. (World Cup 2023)

अॅश्टन अगर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला रवाना

ऑस्ट्रेलियन संघासाठीही एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक अॅश्टन अॅगर विश्वचषक खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. त्याला मोठी दुखापत झाल्यामुळे तो मायदेशी परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच ऑस्ट्रेलियन संघात त्याच्या जागी कोणता खेळाडू घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयसीसीच्या अंतिम मुदतीनुसार, 28 सप्टेंबरपर्यंतच संघाच्या खेळाडूंच्या यादीत बदल केला जाऊ शकतो. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर काही संघही त्यांच्या संघात किरकोळ, मोठे नसले तरी बदल करू शकतात. पण एकंदरीत हे दोन खेळाडू मायदेशी परतणे ही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी म्हणता येणार नाही. (World Cup 2023)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT