पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ( World Cup 2023 final ) अंतिम सामन्याचा आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत २३५७ धावांचा टप्पा ओलांडला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणार्या भारतीय फलंदाजांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अग्रस्थानी आहे. त्याने ३,०७७ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत २३५७ धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर विराट कोहली तिसर्या स्थानावर असून त्याने २३१४* धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे. या संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर धावा करणे हे नेहमीच प्रत्येक फलंदाजासाठी आव्हान असते. जगभरातील फलंदाजांची तुलना करता सचिन तेंडुलकर यानेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा :