Latest

Nikhat Zareen : निखत जरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने (Nikhat Zareen) जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. निखतने गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कोलंबियाच्या इंग्रिड व्हॅलेन्सियाचा 5-0 ने पराभव केला. याचबरोबर तिने 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

2022 च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये निखतने सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हा ती 52 किलो वजनी गटात खेळली होती.

नीतू घनघास देखील फायलमध्ये

राष्ट्रकुल चॅम्पियन नीतू घनघास (48 किलो) हिनेही जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली. हरियाणातील 22 वर्षीय नीतूने उपांत्य फेरीत गतवर्षीची आशियाई चॅम्पियन आणि गतवर्षीची जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती कझाकिस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाचा पराभव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT