Latest

सासू, सासऱ्यांचा मानसिक शांततेसाठी सुनेला घराबाहेर काढता येणार नाही : उच्च न्यायालय

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयस्कर सासू, सासऱ्यांच्या मानसिक शांततेसाठी सुनेला सासरच्या घरातून बाहेर काढता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना शांतपणे त्यांच्या घरात राहाण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्या रक्षणासाठीच्या कायद्यांचा वापर करताना घरगुती हिंसाचार विरोधी कायद्यातील (Protection of Women from Domestic Violence Act, 2005) तरतुदींची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Bombay High Court)

न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निकाल दिला आहे. "वरिष्ठ नागरिक कायद्यातील तरतुदींचा वापर घरगुती हिंसाचार कायदा कलम १७च्या तरतुदींच्या विरोधात होऊ नये," असे ते म्हणाले. Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Actमधील तरतुदींनुसार एका एका न्यायधीकरणाने हा निकाल दिला होता. ही बातमी बार अँड बेंचने दिली आहे.

या प्रकरणातील जोडप्यांचे लग्न २७ वर्षांपूर्वी झाले होते. या जोडप्यात सातत्याने भांडणे होत होती. हे घर सासऱ्यांच्या मालकीचे होते. न्यायधीकरणाने या जोडप्याला घर खाली करण्याचा आदेश दिला. पण नवऱ्याने मात्र हे घर सोडले नाही. त्यामुळे सुनेला घरातून बाहेर काढण्यासाठी केलेली ही खेळी होती, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT