Latest

Digestion : हिवाळ्यात पचनक्रियेत सुधारणा करण्यासाठी

backup backup

हिवाळ्यात अन्नाचे पचन चांगले (digestion) होते, या समजुतीखाली नानाविविध पदार्थांवर ताव मारला जातो आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या पचनसंस्थेवर होतो. हिवाळ्यात बहुतेक लोकांना जठर आणि आतड्यांसंबंधी त्रास होतो. सांधे आणि स्नायूंच्या वेदनांप्रमाणेच, हिवाळ्यात आतड्यांसंबंधी समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आतड्यांचे आरोग्य म्हणजे पचनसंस्थेतील (digestion) सूक्ष्मजीवांचे संतुलन. या सूक्ष्मजीवांचे योग्य संतुलन राखण्याकरिता आतड्यांच्या आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

पचनक्रियेतील (digestion) सुधारणा आणि उपाय

अतिथंड आणि कच्च्या पदार्थांचे सेवन टाळा: थंड आणि कच्चे पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरते. कारण, त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो. हिवाळ्यात चयापचय क्रियादेखील मंदावते. शक्यतो सॅलड खाणे टाळा. जठर आणि आतड्यांसंबंधी अस्वस्थता कमी करण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. घरच्या घरी स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा आणि चालण्यासारखा व्यायाम करू शकता.

तुमची पचनशक्ती नियंत्रित ठेवायची असेल तर हवाबंद डब्यातील पदार्थांचे सेवन टाळावे. शर्करायुक्त, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन कमी करावे. जंक फूडमुळे पचनक्रिया मंदावते. म्हणूनच निरोगी आहाराच्या सवयी लावणे गरजेचे आहे. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, कडधान्ये, मसूर आणि तेलबियांचे सेवन करावे.

जेव्हा तापमान अचानक कमी होते, तेव्हा द्रवपदार्थाचे सेवनदेखील कमी केले जाते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल. त्यामुळे हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. आहारात पुरेसे द्रव घेण्याचा प्रयत्न करावा. योगा आणि ध्यान करून तणावमुक्त राहावे. एखाद्याच्या पचनसंस्थेवर ताण नकारात्मक परिणाम करतो. तुम्हाला आवडणारे उपक्रम करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. चित्र काढणे, संगीत ऐकणे किंवा नवीन भाषा किंवा कला शिकणे यांची निवड करू शकता. अतिखाणे टाळावे. दर दोन तासांनी खाण्याचा प्रयत्न करावा आणि अन्न व्यवस्थित चावून खावे. वजन वाढू नये म्हणून एका लहान ताटात खावे.

डॉ. रॉय पाटणकर 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT