Latest

Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नागपुरात आगमन

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आज (दि. ६) आगमन झाले.

आज (दि. ६) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील काही सदस्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सदस्य दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांचेही आगमन झाले. नागपूर विमानतळावर आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,आ.आशिष जायस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले.

SCROLL FOR NEXT