Latest

गृहकलह टाळण्यासाठी सुप्रिया सुळे वेगळा मतदारसंघ निवडणार का ? शरद पवार स्पष्टच बोलले 

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन :  राज्यात सध्या राजकीय वातावरण तापवल आहे ते पवार काका -पुतण्याने. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर पवार कुटुंबातील हेवेदावे आता मोठ्याप्रमाणावर समोर येताना दिसत आहेत. त्यात नुकतंच कर्जतमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे सांगितले. यानंतर दोन्ही गटांकडे असलेल्या बारामती या कॉमन जागेची चर्चा सुरू झाली. बारामतीमधून लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत असताना अजित पवार यांच्या गटांकडून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

सुनेत्रा पवार या बारामतीमधून भाजपाच्या पाठिंब्यावर लढणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच शरद पवार यांना सुप्रिया यांच्या मतदारसंघाबाबत विचारलं गेलं. यावर शरद पवार म्हणाले, " सुप्रियाने कोणत्या मतदारसंघातून लढावं हा निर्णय पक्षाच्या अध्यक्षांचा आहे. त्यामुळे याबाबत मी काही बोलू शकत नाही'.

तसेच अजित पवारांनी केलेल्या चार मतदारसंघांच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले. " लोकशाही नुसार कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कोणत्याही मतदारसंघातून भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याबाबत तक्रार करण्याचे कोणतेच कारण नाही.'

प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकांची वाट पहातो आहे…

प्रफुल्ल पटेल त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत पुस्तक लिहिणार असल्याच माध्यमांनी सांगितलं असता, पवार म्हणाले ' प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तक लिहिण्याची वाट बघतोय. प्रफुल्ल पटेल यांचं दिल्लीतील घर ईडीने ताब्यात घेतलं होतं. ते देखील त्यांनी पुस्तकात लिहावं.

SCROLL FOR NEXT