Latest

निम्मा पगार देईन; पण मला माय लॉर्ड म्हणू नका; असं का म्हणाले न्यायमूर्ती?

मोहन कारंडे

नवी दिल्ली : न्यायमूर्तीना माय लॉर्ड किंवा युअर लॉर्डशिप ही संबोधने वापरू नयेत, असा ठराव बार कौन्सिलने २००६ मध्ये मंजूर केला असतानाही सर्रास ही संबोधने वापरली जातात. किती वेळा सांगायचे की, मला माय लॉर्ड म्हणू नका, मी माझा निम्मा पगार तुम्हाला देईन; पण हे संबोधन बंद करा, असे उद्गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांनी एका सुनावणीदरम्यान काढले.

न्या. नरसिंहा आणि न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना एक ज्येष्ठ वकील माय लॉर्ड आणि युअर लॉर्डशिप ही संबोधने वापरून युक्तिवाद करत होते. त्यावर नरसिंहा यांनी त्या वकिलांना समज दिली. तुम्ही सर हे संबोधन वापरा. यापुढे मी ज्येष्ठ वकील किती वेळा माय लॉर्ड संबोधन वापरतात तेच मोजणार आहे. कृपा करून हे संबोधन वापरणे बंद करा. २००६ मध्ये बार कौन्सिलने एक ठराव करून माय लॉर्ड व युवर लॉर्डशिप ही संबोधने न वापरण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता; पण त्याची अंमलबजावणीच होताना दिसत नाही. ब्रिटिशकालीन गुलामगिरीची मानसिकता या दोन संबोधनांतून दिसते, असे त्यावेळी या संबोधनांना विरोध करताना म्हटले गेले होते.

SCROLL FOR NEXT