Latest

Sharad Pawar : शरद पवार राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांना समज देणार

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी पक्षातील काही सहकाऱ्यांच्या विधानामुळे ब्राम्हण संघटनांमध्ये अस्वस्थता होती. कोणत्याही जाती धर्माबद्दल अशी विधाने होऊ नयेत. यापुढे कोणत्याही जाती धर्मांबाबत आक्षेपार्ह विधान करू नयेत, अशी समज पक्षातील सहकाऱ्यांना देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)  यांनी शनिवारी (दि.२१)  पत्रकार परिषदेत दिली.

९ ते १० ब्राम्हण संघटनांच्या ४० प्रतिनिधींनी शनिवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेऊन काही मुद्द्यांवरील आपली अस्वस्थता मांडली. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

ते म्हणाले की, ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींनी मला भेटून पक्षातील सहकाऱ्यांच्या विधानामुळे ब्राम्हण संघटनांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडले. मागास वंचित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांचे कुविख्यात डॉन दाऊन इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मलिकांना अनेक वर्षापासून मी ओळखतो. त्यांचे दाऊद याच्याशी संबंध असतील, असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले.

हेही वाचलंत का ?  

SCROLL FOR NEXT