Latest

धक्कादायक ! उसने पैसे दिले नाही म्हणून पुण्यात पतीसमोरच पत्नीवर बलात्कार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडला. याप्रकरणी आरोपीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठेाकल्या आहेत. इम्तीयाज हशीम शेख (47, रा. सुरक्षानगर, म्हाडा कॉलनी हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 34 वर्षीय महिलेनी हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती उदरनिर्वाहासाठी बॅगा विकण्याचे काम करतोत. तर मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस 40 हजार रूपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये इम्तीयाज याने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलवून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवुन चाकुचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यासमोरच फिर्यादीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने याच कारणातून तिला पुन्हा शरीर सुखाची मागणी केली.

परंतु तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सिसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून व व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारीत केले. दरम्यान याप्रकणात महिलेनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली. दरम्यान त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके करत आहेत

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT