Latest

Divorce | नवऱ्याला नपुंसक म्हणणे, आणि लैंगिक जीवनाबद्दल जाहीर चर्चा करणे कौर्य : उच्च न्यायालय

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बायकोने नवऱ्याला नपुंसक म्हणणे आणि लैंगिक जीवनाबद्दल जाहीर चर्चा करणे हे मानसिक कौर्य आहे, आणि हे कृत्य घटस्फोटासाठी आधार मानले जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांनी हा निकाल दिला आहे. नवऱ्याच्या खासगी जीवनाबद्दल बायकोने अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, असेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे. (Divorce)

न्यायमूर्ती म्हणाले, "बायकोने नवऱ्याला नपुंसक म्हणणे आणि लैंगिक जीवनावर चारचौघात आणि कुटुंबीयांसमोर चर्चा करणे हे अपमानकारक आहे आणि ते मानसिक कौर्य आहे." या आधारावर दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित पुरुषाला घटस्फोट मंजुर केला आहे. हिंदू विवाह कायद्यांच्या तरतुदींनुसार हा घटस्फोट मंजुर करण्यात आला आहे. (Divorce)

या जोडप्याचे लग्न २०११ला झाले आहे. जोडप्याला मूल हवं होतं. पण वैद्यकीय कारणांनी नैसर्गिक गर्भधारणा होत नव्हती, त्यामुळे दोघांनी IVF तंत्रांची मदतही घेतली. पण यातही दोन वेळा अपयश आल्यानंतर दोघांती वाद विकोपाला गेले. हा वाद कौटुंबिक कोर्टात गेला. पण कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची मागणी फेटाळून लावली. नंतर नवऱ्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयातील याचिकेत कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल रद्दबातल ठरवण्यात आला. (Divorce)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT