Latest

गोळ्यांच्या पाकिटावर का असते लाल रेष?

Arun Patil

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात आपण पाहत असलेल्या अनेक वस्तूंमधील काही गोष्टी 'अशाच का?' असा प्रश्न अनेकांना पडत असतो. तुमच्या लक्षात येईल की औषधाच्या गोळ्यांच्या पाकिटावर लाल रंगाची रेष असते. या रेषेचा अर्थ काय आहे हे माहिती आहे का?

लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगली माहिती असते; पण सर्वसामान्य लोकांना ती नसते. अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागू शकत असतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे औषध विकलेही जाऊ शकत नाही की त्याचा वापरही केला जाऊ शकत नाही. अँटिबायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.

लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बर्‍याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्याबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. काही गोळ्यांच्या पाकिटावर 'आरएक्स' असे लिहिलेले असते. त्याचा अर्थ 'हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे'.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT