Latest

‘प्रान’ कार्ड का गरजेचे? जाणून घ्या अधिक

Arun Patil

पीआरएएन (प्रान) म्हणजेच परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर हा बारा आकडी असतो. राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (एनपीएस) नोंदणी केेलेल्या लोकांना हा क्रमांक मिळतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी प्रान आवश्यक आहे. हा क्रमांक नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या माध्यमातून मिळवू शकता.

प्रान क्रमाकांंतर्गत दोन प्रकारच्या एनपीएस योजना येतात. टीयर-1 आणि टीयर-2 खाते. टीयर-1 हे नॉन विड्रॉलवेबल आहे आणि ते निवृत्तीसाठी बचतनिधी उभा करणारे आहे. टीयर-2 खाते हे एखाद्या बचत खात्याप्रमाणे काम करते. यानुसार या खात्यातून पैसे काढण्याची मुभा आहे; मात्र करसवलत मिळत नाही. प्रान नंबर मिळाल्यानंतर एनपीएस खातेधारक प्रान कार्डची फिजिकल कॉपी घेऊ शकतात. प्रान कार्ड हे प्रकारे युनिक आयडीप्रमाणे काम करते. खातेधारक या क्रमाकांत बदल करू शकत नाहीत. ते पॅनकार्डप्रमाणेच असते. प्रान कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.

प्रान (कायम सेवानिवृत्त खाते क्रमांक) हा राष्ट्रीय पेन्शन प्रणालीप्रमाणे काम करतो. प्रानकार्डसाठी भरला जाणारा अर्ज एनपीएस सदस्यत्वासाठी वापरला जातो. अर्ज भरताना अर्जदाराची वैयक्तिक माहिती, अर्जदाराच्या नोकरीचे विवरण, वारशाचे विवरण, योजनेचे विवरण आणि 'पीएफआरडीए' डिक्लेरेशन द्यावे लागते.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

एनएसडीएल किंवा कार्वी संकेतस्थळावर एनपीएस खाते सुरू करता येते. एनपीएस खात्याचे संचलन आणि अ‍ॅक्टिव्हेट करण्याचे काम 'सीआरए'कडे सोपवले आहे. ऑनलाइन पोर्टलचा वापर करत आधार किंवा पॅन कार्डने प्रानसाठी अर्ज करू शकता. आधारचा उपयोग करून प्रानसाठी अर्ज करत असाल तर एनपीएस केवायसीसाठी आधार ओटीपी ऑथेटिफिकेशनची मदत घेता येईल. त्याचा वापर करत प्रान नंबर मिळवण्याची आणि एनपीएस खाते सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.

आधार ओटीपी हा डेटाबेसवर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठविला जातो. डेमोग्राफिक डिटेल आणि फोटो हा आधार डेटपासून घेतला जातो. अशा वेळी ऑनलाइन अर्ज आपोआप भरला जातो. सर्व डिटेल ऑनलाइन भरावे लागतात. रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये स्कॅन सही अपलोड होते. या गोष्टी जीपीईजी/जेपीजी फॉर्मेटमध्ये चार केबी-12 केबी आकाराच्या असणे गरजेचे आहे. आधार कार्डवरून मिळालेला फोटो एनपीएस खात्यावर नको असेल तर स्कॅन फोटो अपलोड करू शकता. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगने एनपीएस खात्याचे पेमेंट करू शकता. यासाठी पेमेंट गेटवेवर पाठवले जाऊ शकते.

कोणते डॉक्यूमेंट महत्त्वाचे?

प्रान कार्डसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक आणि कॅन्सल चेकची स्कॅन कॉपी, स्वाक्षरीची स्कॅन कॉपी आणि पासपोर्टची स्कॅन कॉपी असणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT