Latest

Pumpkin : लंडनमध्ये हॅलोवीनचे वेध, भोपळ्यांचा खप अचानक वाढणार?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्षाअखेर लंडनमध्ये हॅलोवीन आणि ख्रिसमस या सणाचे वेध लागतात. मोठ्या प्रमाणात आणि आकर्षक पद्धतीने हे सण साजरे केले जातात. त्यामुळे हॅलोवीन सणाच्या पार्श्वभूमीवर भोपळे (Pumpkin) प्रचंड प्रमाणात खरेदी केले जातात. यंदाच्या हॅलोवीन सणाचा विचार करता १ कोटी ७० लाख भोपळे यावर्षी खरेदी केले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या सणामध्ये घरातील दरवाडे-खिडक्या भोपळ्याने सजविले जातात. घरातील पाळीव प्राण्यांनाही सजविण्यात येते. त्यामध्ये लहानग्यांपासून थोरांमध्ये सर्वांच्या चेहऱ्यांवर उत्साह असतो. यामुळे यंदाच्या सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्के लोकांनी भोपळ्याचा शोध घेतला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात १५ हजारांपेक्षा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

हॅलोवीनमध्ये भोपळा आतून पोकळ केला जातो. त्याला राक्षसाच्या चेहऱ्याचा आकार दिला जातो. खरंतर त्यामध्ये प्रकाशदिवा सोडून कंदील केला जातो. दृष्ट आत्म्यांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी असे भोपळे घरासमोर अडकवले जातात. यासंदर्भात जोनो स्मालेस शेतकऱ्याने तर चार पटीने म्हणजे २ लाख भोपळ्यांची लागवड केली आहे. कारण, वाढलेली मागणी पूर्ण करू शकेल.

हॅलोवीन सण कसा सुरू झाला? 

हॅलोवीन शब्द १७४५ पासून वापरला जाऊ लागला. भारतामध्येही काही लोक हॅलोवीन साजरा करतात. हा सण मूळात इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे. याच भागात या प्रथेला सुरूवात झाली. नंतरच्या काळात विविध देशांमध्ये आयरिश समाज हा सण पसरत गेला, तसे याचे उत्सव साजरे करण्याचे स्वरुप बदलत गेले. युरोपीन देशात प्रामुख्याने सॅल्टिक समाजातील मान्यतेनुसार, हॅलोवीन दरम्यान मृत व्यक्तींचे आत्मे त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतात. त्यामुळे भूतांची- प्रेतांची वेशभूषा करण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते.

हॅलोवीन कसा साजरा केला जातो?

हा सण इंग्लंड आणि आर्यलंडचा जरी असला तरी तो अमेरिकेत तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भोपळ्याला (Pumpkin) आतून पोकळ केले जाते. त्यात राक्षसासारखा आकार दिला जातो. त्यामध्ये काळा आणि नारंगी रंग जास्त वापरला जातो. याला जॅक ओ लॅटन्स असंही म्हणतात. खरंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सण साजरा केला जातो. पण, ३१ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात हॅलोवीन हा सण साजरा केला जातो. थोडक्यात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी हॅलोवीन हा सण साजरा केला जातो.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील हिंदू -मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा दर्गा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT