Latest

Pavankhind : अजय पुरकर कोण आहे?; ज्यांनी बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी जीवतोड केली मेहनत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मृत्यूलाही प्रतीक्षा करायला लावणार्‍या बाजीप्रभूंची झुंज पावनखिंड या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेले वैभव रूपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे. मावळ्यांच्या पवित्र रक्‍ताने पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास पावनखिंड चित्रपटातून सर्वांसमोर आलाय. तुम्हाला माहिती आहे की, य़ा चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे? त्याचं नाव आहे अजय पुरकर. अजय पुरकर याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका हुबेहुब साकारण्यासाठी जीवतोड मेहनत घेतलीय.

'तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला!' असे म्हणत मृत्यूलाही थांबायला सांगणार्‍या शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याची यशोगाथा या चित्रपटात पाहायला मिळतेय. अभिनेते अजयने बाजीप्रभूंची भूमिका साकारलीय. या चित्रपटासाठी चिन्मय मांडलेकरने पुन्हा शिवरायांचे रूप धारण केले आहे. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

ajay purkar- विसोबा शास्त्री : मालिका ज्ञानेश्वर माऊली

कोण आहे Ajay purkar?

अजयचं या चित्रपटातील अभिनयाचं खूप कौतुक होतंय. त्याने आणि त्याच्या टीमने जे कष्ट घेतलेत, त्याचे यश या चित्रपटाच्या माध्यमातून दिसत आहे. अजय एक उत्तम अभिनेता आहे. त्याने टीव्हीवर ऐतिहासिक भूमिका साकारली होती. ही त्यांची पहिली ऐतिहासिका भूमिका प्रतापराव गुजर यांची होती. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या 'राजा शिवछत्रती'मध्ये ही भूमिका होती. काही ठराविक अभिनेत्यांनाचं अशी भूमिका मिळते, हे माझं भाग्य असल्याचं म्हणतो.

ajay purkar- विसोबा शास्त्री : मालिका ज्ञानेश्वर माऊली

व्यायामाची आवड

अजय यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर त्यांना व्यायामाची आवड असल्याचे समजते. त्यांच्या इन्स्टावर जिममधील अनेक व्हिडिओ दिसतात. अनेक व्हिडिओ हे कसरत करतानाचे आहेत. बाजीप्रभूंसारखी शरीरयष्टी व्हावी, यासाठी त्याने जिममध्ये घाम गाळला आहे. त्याने व्यायामाचे व्हिडिओ शेअर करताना तशी कॅप्शनही दिलीय.

ajay purkar

खूप कष्ट घेतले

या पात्राची भूमिका साकारण्यासाठी अजय यांनी खूप मेहनत घेतली आहे. ट्रेनर यांचं योगदानही आहे. सकाळी ५ वाजता ट्रेनर जिम उघडायचे. पुन्हा पुढे अजय यांना जिममध्ये व्यायाम करवून घ्यायचे. अख्खा चित्रपटचं भावूक आहे. त्यामुळे तयारी करतानाही भावूक व्हायला झालं, असं अजय एका मुलाखतीत म्हणाला.

युद्धाचा प्रसंग

बाजींना वीरगती प्राप्त झाली, त्यासाठी अख्खा एक दिवस शूट करण्यासाठी ठेवलं होतं. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. असा शेवटचा हा सीन डोळ्यात पाणी आणणारा असल्याचंही अजय म्हणाला.

ajay purkar

उत्तम गायक, उत्तम अभिनेता

सिंगिग स्टार या छोट्या पडद्यावरही अजय यांनी गाण्यांचे सुंदर सादरीकरण दिलं होतं. सारेगमपा या शोमध्ये त्याने लागा चुनरी में दाग, नमक इश्क का ही गाणी गाऊन त्याने सर्वांना भूरळ घातली. 'फर्जंद' चित्रपटामध्ये त्यांनी मोत्याजी मामा ही भूमिका साकारली होती. असंभव या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर वजलवारची भूमिका त्यांनी साकारली होती. या मालिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. गुंतता हृदय या मालिकेत तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसला होता. तू तिथं मी या मालिकेत मंजिरीच्या काकाची भूमिका त्याने साकारली होती.

ajay purkar

शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरे सुवर्णपान 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडले आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर १८ फेब्रुवारीला पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झालाय.

SCROLL FOR NEXT