Latest

विधानपरिषद रणधुमाळी : राष्ट्रवादीला मतदान करू शकणारे भाजपचे ‘ते’ दोन आमदार कोण?, खडसे म्हणाले….

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या रणधुमाळीनंतर आज (दि.२०) विधानपरिषदेच्या १० जागांसाठी चुरशीची निवडणूक होत आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेलाही महाविकास आघाडी तोंडघशी पडणार की पराजयाचा बदला घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे मतदान गुप्त पद्धतीचे असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना भाजपचे आमदार मतदान करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात फिरत आहे.

एकेकाळचे भाजपचे एकनिष्ठ असणारे खडसे पक्षांतर्गत कारणांमुळे राष्ट्रवादी पक्षात आले. पण भाजमधील त्यांच्या सलगीतील व मैत्रीतील नेते त्यांच्यापासून दुरावले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ते भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांचे. सावकारे निवडून येण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा सहभाग होता. त्याचसोबत खडसे-सावकारे यांचे जवळचे संबंधही आहेत. खडसेंच्या उपकाराची परतफेड कारण्यासाची हीच वेळ असल्याने सावकारे खडसेंना मतदान करण्याची शक्यता मोठी आहे. त्यांच्या सोबत जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचेही खडसेंशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्ये मत खडसेंच्या पारड्यात पाडण्याचीही शक्यताही वर्तवली जात आहे.

खडसेंना हरवण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखलेली असल्याची चर्चा असतानाच आज खडसे बोलताना म्हणाले की भाजपचे आमदार त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, ते मला मतदान करणार नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT