Latest

चंद्रदर्शन झाले, रमजान सुरू : मंगळवारपासून मुस्लिम धर्मीयांचे रोजे सुरू | Ramadan 2024

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्रदर्शन सोमवारी सायंकाळी झाल्यानंतर मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. त्यानुसार १२ मार्चला रमजानचा पहिला रोजा असेल. तर पहिली तरावीहची नमाज सोमवारी (११ मार्च) होत आहे. सोमवारी सायंकाळी कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येथे चांद कमिटीची बैठक झाली. मुंबई येथे चंद्रदर्शन झाल्याची माहिती चांद कमिटीत देण्यात आली. त्यानंतर रमजानचे रोजे मंगळवारपासून सुरू होत असल्याचा निर्णय चांद कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूरआलम कासमी यांनी जाहीर केला. यावेळी मौलाना इरफान कासमी, मौलाना मुबीन, मौलाना नाजिम पठाण, मौलाना अब्दुलसलाम कासमी आदी उपस्थिती होते. या संदर्भातील पत्रक दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. Ramadan 2024

SCROLL FOR NEXT