पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर नेणारी माजी कर्णधार मिताली राजने ८ जूनला निवृत्ती जाहीर केली. वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत मितालीने भारतासाठी १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामने खेळून क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य केले. (Mithali Raj 214)
मिताली ही जगातील दुसरी आणि सर्वाधिक प्रदीर्घ कारकीर्द करणारी भारतातील पहिली क्रिकेटपटू आहे. याबाबतीत तिच्यासोबत फक्त झुल गोस्वामीचेच नाव नोंदवले गेले आहे. मिताली १४ जानेवारी २००२ ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत १९ वर्षे कसोटी क्रिकेट खेळत राहिली. तिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली, पण तिच्या कसोटी कारकिर्दीत असा एक विक्रम आहे, ज्याने २० वर्षांपूर्वी जगाला थक्क केले होते. (Mithali Raj 214)
भारतीय महिला संघ ऑगस्ट २००२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचा दबदबा होता. अशा परिस्थितीत हा दौरा भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक मानला जात होता. भारतीय संघाला येथे न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबतच्या तिरंगी मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आव्हान वाढले. आता कसोटी मालिकेत काय होणार याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. (Mithali Raj 214)
त्यानंतर टॉंटन येथील मैदानावर दुसरी कसोटी रंगली. इंग्लंडने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या दोन सलामीवीर सुनेत्रा परांजपे आणि ममता माबेन ४५ धावांवर बाद झाल्या. दुस-या दिवशी भारताचा ढासळणारा डाव कर्णधार अंजुम चोप्रा आणि मिताली राज यांनी सांभाळला, पण कर्णधार अंजुम ५२ धावा करून बाद झाली. (Mithali Raj 214)
भारतीय संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले, मात्र मितालीने दोन दिवस क्रीजवर नांगर टाकून एकबाजूने संघाचा डाव सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती. एकामागून एक इंग्लंडच्या गोलंदाजांनी मितालीला बाद करण्याचा प्रयत्न केला, पण ती पाय रोवून क्रीजवर फलंदाजी करत होती. तब्बल ९ गोलंदाज वापरून मितालीला तंबूत पाठवण्यासाठी यजमान इंग्लीश गोलंदाजांनी जीवाचे रान केले. पण, मितालीने त्यांच्या भेदक मा-यासमोर डगमगली नाही. उलट तिनेच या गोलंदाजांच्या तोंडाला फेस आणला. (Mithali Raj 214)
मिताली राजने ४०७ चेंडू आणि ५९८ मिनिटे खेळत आपल्या बॅटने असा कहर केला की जागतिक क्रिकेटमधील अनेक विक्रम उद्ध्वस्त होत गेले. मितालीने १९ चौकारांच्या मदतीने २१४ धावांची खेळी करत क्रिकेटच्या जगतात धुमाकूळ घातला. तिने द्विशतक ठोकून महिला क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले. इसा गुहाच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर ती अखेर दुसऱ्या दिवशी पॅव्हेलियनमध्ये परतली, पण त्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी ती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. त्याआधी रोल्टनने २००१ मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना महिला कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. तिचा हा विक्रम राजस्थानच्या जोधपूर येथे जन्मलेल्या १९ वर्षीय मितालीने मोडीत काढला. मात्र, मितालीला दोन वर्षांतच पाकिस्तानी फलंदाज किरण बलूच हिने मागे टाकले. किरणने वेस्ट इंडिजविरुद्ध २४२ धावा केल्या. (Mithali Raj 214)
इंग्लंड विरुद्धच्या त्या सामन्यात झुलन गोस्वामीने मितालीला चांगली साथ दिली आणि तिने ६२ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात ४६७ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद १९८ धावा केल्या आणि अखेर चौथ्या दिवशी सामना अनिर्णित राहिला.