वॉशिंग्टन : व्हॉटस्अॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑडियो मेसेजसाठी नवीन फीचर सादर केले आहे. ज्याचे नाव 'व्ह्यू वन्स' आहे. हे आल्यामुळे युजरनी एकदा ऐकल्यानंतर व्हॉइस नोट आपोआप डिलिट होईल. कंपनीच्या मते ही फिचर खूप उपयुक्त ठरेल. त्यांना वारंवार व्हॉइस मेसेज डिलिट करण्याची आवश्यकत नाही.
याआधी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटस्अॅपने ही सुविधा फोटो आणि व्हिडीओसाठी जारी केली होती. व्हॉटस्अॅपने आपल्या अधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले आहे की व्ह्यू वन्स फीचर आल्यामुळे आता युजर्सना व्हॉइस नोटच्या पुढे 'वन टाइम' चं आयकॉन दिसेल, ज्यामुळे समजेल की तो मेसेज फक्त एकदा ऐकता येईल. ऐकल्यानंतर व्हॉइस मेसेज आपोआप डिलिट होईल. त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही किंवा सेव्हही करता येणार नाही. तसेच व्हॉइस मेसेजचा स्क्रीनशॉटही घेता येणार नाही.
कंपनीने म्हटले आहे की आम्ही 2021 मध्ये फोटो आणि व्हिडीओसाठी 'व्ह्यू वन्स' फीचर लाँच केले होते. त्यामुळे युजर्सना प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त प्रायव्हसी सुरक्षा मिळाली. आम्हाला आनंद होत आहे की हे फिचर आता ऑडियो मेसेजसाठी रोलआऊट केले जात आहे. युजर्सचे व्हॉइस नोट लीक होणार नाहीत. फोटो आणि व्हिडीओ प्रमाणे व्हॉइस मेसेज देखील एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्टेड आहेत. तसेच आता त्यात आणखी एक सुरक्षा लेयर जोडली गेली आहे.