पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp हे गेल्या काही तासापासून बंद झाले आहे. मेसेज पाठवण्यास आणि मिळवण्यास अडचणी आल्याच्या असंख्य तक्रारी यूजर्संनी केल्या आहेत. व्हॉटस्ॲप डाउन झाल्याच्या तक्रारी यूजर्संनी ट्विटरवर केल्या आहेत.
WhatsApp हे इन्स्टंट कम्युनिकेशन ॲप आहे. व्हॉटस्ॲप डाउन झाल्याने ग्रुपवर मेसेज पाठवणे अशक्य झाले आहे. वैयक्तिक चॅट्सवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. आउटेज डिटेक्शन वेबसाइट DownDetector याची पुष्टी करत म्हटले आहे की WhatsApp डाउनचा लाखो यूजर्संना फटका बसला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौ यासह भारतातील अनेक भागांत व्हॉट्सॲप चालत असल्याचे आढळून आले आहे.
आज दुपारी १२.०७ मिनिटांनी व्हॉट्सॲप डाउन झाल्याचे Down Detector ने म्हटले आहे. मेसेज जाणे बंद झाले आहे. तसेच सर्व्हर डिसकनेक्शन आणि हे ॲप क्रॅश झाल्याच्या तक्रारी यूजर्संनी केल्या आहेत. भारतासह इटली, तुर्की या देशांतही व्हॉट्सॲप डाउन झाल्याचे तिथल्या यूजर्संनी ट्विट करत म्हटले आहे.
ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवर #WhatsAppDown या हॅशटॅगसह मीम्स व्हायरल होत आहेत. बर्याच यूजर्संनी सांगितले की त्यांना प्रथम वाटले की त्यांच्या इंटरनेट सेवेमुळे व्हॉट्सॲप चालत नाही की काय?. पण आता जगभरातून व्हॉट्सॲप डाउन झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
दरम्यान, व्हॉट्सॲपच्या समस्येची आम्हाला कल्पना आहे. लवकरच सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे मेटाच्या प्रवक्त्यानी म्हटले आहे.
हे ही वाचा :