Latest

WhatsApp Community : व्हाट्सअ‍ॅप कम्युनिटी! जाणून घ्या या नव्या फिचरविषयी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा कंपनीचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅप सध्या नवनवे फिचर्स आणत असलेले दिसून येत आहे. व्हाट्सअ‍ॅपने (WhatsApp) अलीकडेच एक कम्युनिटी हे नवे फिचर आणले आहे. या नव्या फिचरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अनेक जणांना हे नवे फिचर कशासंबंधी आहे, काय काम करेल याबाबत माहिती नाही. (WhatsApp Community)

व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फीचरद्वारे मतदान केले जाऊ शकते, एका टॅप व्हिडिओ कॉलिंगशिवाय, व्हिडिओ कॉलिंगमध्ये ३२ लोक एकाच वेळी ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. या वैशिष्ट्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की आपण सर्व गटांना एकाच समुदायामध्ये ठेवू शकतो. (WhatsApp Community)

कम्युनिटीमध्ये, जास्तीत जास्त 20 गट समाविष्ट केले जाऊ शकतात. कंपनीने कम्युनिटीजची चाचणी एप्रिलमध्ये पहिल्यांदा केली होती. त्यानंतर ही सुविधा आता प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवीन कम्युनिटी फिचर कसे काम करते

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन कम्युनिटीज फीचर हे ग्रुप बनवण्यासारखेच आहे. परंतु याचे वेगळेपण हे आहे की यामध्ये अनेक यूजर्स आणि ग्रुप जोडता येऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फिचर फक्त एकाच संभाषणाचा भाग बनवला जाऊ शकतो, पण कम्युनिटीज पसंतीचे व नापसंतीचे अनेक गट एकत्र आणले जाऊ शकतात. म्हणजेच, संबंधित गटांमध्ये चॅट करणे आणि त्यांना एकमेकांशी जोडणे सोपे होईल.

कम्युनिटी फिचरचा वापर कसा करायचा

आयफोन युजर्ससाठी कम्युनिटी हा पर्याय चॅटच्या उजवीकडे देण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये, हा पर्याय स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजवीकडे दिला आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन फीचर वेगळ्या टॅबमध्ये दिलेले आहे. कम्युनिटी तयार करण्यासाठी खालील स्टेप्सचा वापर करावा लागेल.

1. सर्वप्रथम, WhatsApp उघडा आणि कम्युनिटी पर्यायावर टॅप करा.
2. त्यानंतर कम्युनिटी प्रोफाईल तयार करावी लागेल. यासाठी नाव आणि वर्णन लिहून प्रोफाइल फोटो लावावा लागेल. याला काही अटी आहेत, यामध्ये नाव २४ वर्णांची मर्यादा आहे.
3. हिरव्या बाणाच्या चिन्हावर टॅप करून, तुम्ही नव्या गटाला कम्युनिटीचा भाग बनवूता येतो. किंवा नवीन गट तयार करता येतील.
4. कम्युनिटीमध्ये गट जोडल्यानंतर, शेवटी हिरव्या चेक मार्क चिन्हावर टॅप करावे लागेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT