Latest

नक्की काय आहे ‘बिग बॉस मराठी’ची ‘All is well’ थीम ? घराचे हे फोटो पाहा आणि तुम्हीच ओळखा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठी मनोरंजनाचा बाप परत येतोय ! ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो, ज्याने लॉकडाउनमध्ये एंटरटेनमेंट अनलॉक केलं, सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या बातम्यांना आणि चर्चेला उधाण येतं, आणि तो येताच सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा असते. कारण चर्चा त्याचीच होते ज्यात काही खास असतं ! यावर्षी तो परत येतोय अधिक भव्य स्वरूपात, काही नव्या सरप्राईझेसना घेऊन. तो सज्ज आहे नव्या सदस्यांसोबत, नव्या रूपात. आता ते घर परत येत आहे. एक असं घर ज्याने सदस्यांचे भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने नाती कशी निभवावी हे शिकवलं,जीवनाकडे कसं बघावं आणि कसं जगावं हे शिकवलं.

ज्याने सदस्यांची अनेक रूपं पाहिली. "त्या" घरात विविध,बहुरंगी स्वभावांच्या व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र येणार. त्या घराचा दरवाजा पून्हा उघडणार, कारण पुन्हा एकदा येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी. विविध क्षेत्रातील १६ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन ४ सज्ज आहे, मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे,मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बिग बॉस मराठीचं या सिझनमधील घर खूप खास आणि आलिशान असणार आहे. बिग बॉसचे घर जे जवळपास १४,००० चौरस फूट
अश्या भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. सगळ्यात पहिले घरामध्ये दाखल झाल कि, एक गोष्ट अगदी ठळकपणे दिसून येते ती म्हणजे घरामध्ये रंगांचा अतिशय सुंदररित्या केला गेलेला उपयोग आणि त्यामुळेच घर प्रसन्न, आकर्षक वाटतं. विविध रंगांनी नटलेलं हे बिग बॉस मराठीचं नवं घर कलर्स मराठीला साजेसं असं असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.