Latest

ODI वर्ल्डकप मिशनसाठी संघ जाहीर! IPL मध्ये खेळणाऱ्या 7 खेळाडूंची एन्ट्री

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात झिम्बाब्वे येथे होणाऱ्या वनडे वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. कीमो पॉलचे संघात पुनरागमन झाले असून झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुडाकेश मोटी यालाही संघात स्थान मिळाले आहे. यष्टिरक्षक फलंदाज शाई होप याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. मात्र, आयपीएलमध्ये चमक दाखवणाऱ्या शिमरन हेटमायरला या संघातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, जे खेळाडू वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी निवडलेल्या संघाचा भाग आहेत आणि आयपीएलमध्ये खेळत नाहीत ते शारजाह येथे यूएई विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी कव्हर म्हणून यूएई मालिकेसाठी चार अनकॅप्ड खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती विंडीजचे मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स यांनी दिली आहे.

2023 च्या ODI वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजचा संघ थेट पात्र होऊ शकलेला नाही. यामुळे आता त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. याची सुरुवात 18 जूनपासून झिम्बाब्वेमध्ये होईल. पात्रता फेरीत एकूण 10 संघ सहभागी होतील. यामध्ये आयर्लंड, नेदरलँड, यूएई, श्रीलंका, नेपाळ, स्कॉटलंड, ओमान, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि यूएसए या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

कीमो पॉलच्या निवडीबद्दल विंडीजचे मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'पॉलमध्ये ज्या प्रकारचे अष्टपैलू कौशल्य आहे ते लक्षात घेता तो आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. तो थ्रीडी खेळाडू असून नव्या चेंडूवर लक्षवेधी गोलंदाजी करू शकतो. सर्व खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे. प्रत्येक खेळाडूला त्यांची भूमिका चांगलीच ठाऊक आहे आणि तो चांगली कामगिरी करेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन, रोवमन पॉवेल आणि जेसन होल्डर हे आयपीएलमध्ये खेळत आहेत. ते वर्ल्डकप पात्रता फेरीच्या संघाचा भाग असल्याचेही निवड समितीने सांगितले.

ODI वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी विंडिजचा संघ :

शाई होप (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), शामराह ब्रूक्स, यानिक कॅरिया, केसी कार्टी, रोस्टन चेस, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक) आणि रोमारियो शेफर्ड.

यूएई मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ :

शाई होप (कर्णधार), ब्रँडन किंग (उपकर्णधार), अलिक अथानाज, शामराह ब्रूक्स, यानिक कॅरिया, केसी कार्टी, रोस्टन चेस, डॉमिनिक ड्रेक्स, कावेम हॉज, अकीम जॉर्डन, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, रेमन रीफ, ओडियन स्मिथ, डेव्हन थॉमस.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT