Latest

जगातील महागडा Miyazaki Mango सिलिगुडीत दाखल, किंमत वाचून व्हाल अवाक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वात महागडा आंबा ( Expensive Mango ) अशी ओळख  असणारा मियाझाकी (Miyazaki Mango) पश्‍चिम बंगालमधील सिलिगुडी आंबा महोत्‍सवात (Mango festival) दाखल झाला आहे. या महोत्‍सवात २६२ हून अधिक आंब्‍यांच्‍या जाती विक्रीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत. तसेच पश्‍चिम बंगालमधील ९ जिल्‍ह्यांतनील ५५ उत्‍पादकांनी या बहुचर्चित महोत्‍सवात भाग घेतला आहे. मात्र चर्चा आहे ती मियाझाकी आंबा आणि त्‍याच्‍या किंमतीची.

असोसिएशन फॉर कॉन्झर्व्हेशन अँड टुरिझम आणि मॉडेला केअरटेकर सेंटर अँड स्कूलने सिलिगुडी येथे आंबा महोत्‍सवाचे आयोजन केले आहे. या महोत्‍सवात सर्वाधिक चर्चा आहे ती जगातील महागडा आंबा मियाझाकी याची. आतंरराष्‍ट्रीय बाजारपेठेत या आंबाची प्रति किलो किंमत तब्‍बल २.७५ लाख रुपये इतकी आहे. या महोत्‍सवात अल्फोन्सो, लंगडा, आम्रपाली, सूर्यपुरी, राणीपसंद, लक्ष्मणभोग, फजली, बिरा, सिंदू, हिमसागर, कोहितूर आणि इतर काही वाणही उपलब्‍ध आहेत.

पश्‍चिम बंगालमधील बीरभूम जिल्‍ह्यातील लाभपूर येथील शेतकरी शौकत हुसेन यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, बांगलादेशातून मियाझाकीची रोपे आणली. बीरभूमधील बागेत याची जोपासना केली. आता मोठे उत्‍पादन मिळाले आहे. महागडा असला तरी मियाझाकीच्‍या  विक्रीला सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला आहे. पश्‍चिम बंगालमध्‍ये शेतकर्‍यांनी मियाझाकीचे उत्‍पादन घेतल्‍यास त्‍यांची आर्थिक स्‍थिती बदलू शकते, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

महोत्‍सवात एकूण २६२ पेक्षा अधिक आंब्‍यांच्‍या जाती विक्रीसाठी ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या मात्र मियाझाकी हे महोत्‍सवाचे प्रमुख आकर्षण होते, असे आंबा महोत्‍सवाचे संयोजन राज बसू यांनी सांगितले.

Miyazaki Mango हे नाव कसे पडले ?

मियाझाकी आंबा हा मुळचा अमेरिकेतील कॅलिफोनिर्यामधील. १९४०मध्‍ये त्‍याचे उत्पादन कॅलिफोर्नियामध्ये सुरू झाले. यानंतर जपानच्या मियाझाकी शहरात हा आंबा गेला. येथे त्‍याचे मुबलक उत्‍पादन झाले. त्यामुळे त्याचे नाव मियाझाकी असे पडले. मागील काही वर्षांमध्‍ये पश्‍चिम बंगालमधील उत्पादकांनी त्यांच्या बागांमध्ये विविधता वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याला 'रेड सन' आणि बंगालीमध्ये 'सूरजा डिम' (लाल अंडा) असेही म्हणतात. हा आंबा त्याच्या पोषक घटक, गोडवा आणि रंग यासाठी लोकप्रिय आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT