Latest

Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराजा पुजारीने पटकावले कास्य

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकूल स्पर्धेत भारताच्या गुरुराजा पुजारी (Commonwealth Games 2022) याने वेटलिफ्टिंगमध्ये कास्यपदक पटकावले. या पुरस्काराद्वारे भारताने आज वेटलिफ्टिंगमध्ये दोन पदकांची प्राप्ती केली. शनिवारी सांगलीच्या संकेत सरगर(Sanket Sargar) याने वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पटकावले. त्याच्या पाठोपाठ गुरुराजा पुजारीने (Gururaj Poojary) कास्यपदक पटकावले.

भारताच्या गुरुराजा पुजारी (Commonwealth Games 2022) याने भारतासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये दुसरे पदक पटकावून दिले. वेटलिफ्टींगच्या ६१ किलो वजनी गटात गुरुराजा पुजारी याने कास्यपदक मिळविण्याची कामगिरी केली. भारताच्या अनुभवी वेटलिफ्टरने एैन मोक्याच्या क्षणी कास्यपदक मिळवत ६१ वजनी गटात एकूण २६९ किलो वजन उचलण्याची कामगिरी नोंदवली.

भारतासाठी आजचा दिवस सर्वोत्तम ठरला. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेमध्ये (Commonwealth Games 2022) भारताच्या दोन खेळाडूंनी वेटलिफ्टींगमध्ये पदके मिळविण्याची कामगिरी केली. सुरुवातीला सांगलीच्या संकेत सरगर याने वेटलिफ्टींगमध्ये ५५ वजनी गटात रौप्यपदक पटाकवले. त्याने एकूण २४८ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. यानंतर भारताचा अनुभवी वेटलिफ्टर गुरुराजा पुजारी याने ६१ किलो वजनी गटात २६९ किलो उचलून भारताला कास्यपदाकाची कमाई करुन दिली.

हे दोन्ही खेळाडू अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. दोघांना देखील या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठे कष्ट करावे लागले, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. गुरुराजा हा मुळचा कर्नाटकातील उडपी या जिल्ह्यातील एका छोट्या गावातून येतो. गुरुराजा पुजारीचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. तसेच त्याला चार भाऊ आहेत. गुरुराजाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट अशी आहे. त्याचे कुटुंबीय त्याला वेटलिफ्टरसाठी आवश्यक असलेला आहार देखील देऊ शकत नव्हते. तरी देखिल परिस्थितीशी दोन हात करत गुरुराजाने सामान्यातून असामान्य अशी झेप घेतली आहे. भारतासाठी आज कास्यपदक मिळवून गुरुराजाने निश्चिय पक्का असला तर सर्व अडथळे आपण पार करु शकतो हाच संदेश आपल्या कामगिरीतून दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT