Latest

तणावामुळेही वाढते वजन

Arun Patil

नवी दिल्ली : जीवनशैली आणि आहारातील अनेक प्रकाराच्या अडथळ्यांमुळे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो. तथापि, याचे एक कारण तणाव आहे. ताणतणावामुळेही वजन वाढते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे तणाव टाळणे हे लठ्ठपणा टाळण्यासाठीही गरजेचे आहे.

जास्त वजन म्हणजे लठ्ठपणा, यामुळे शरीराचा डौल बिघडतो, शिवाय फिटनेसही बिघडतो आणि अनेक आजारही होतात. जीवनशैली आणि आहारातील अनेक प्रकाराच्या अडथळ्यांमुळे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो. तथापि, याचे एक महत्त्वाचे कारण तणाव आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, जास्त काळजी केल्याने वजन वाढू शकते, त्यामुळे तणाव टाळावा. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त ताण घेतल्याने वजन वाढते. वास्तविक, जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे खाण्याची इच्छा वाढते. यामुळे चयापचय क्रियादेखील प्रभावित होऊ शकते. त्यामुळे पोटाची चरबी आणि शरीराचे वजन वाढू शकते.

त्यामुळे तुमचे वजन वाढले असेल, तर तणावावर नियंत्रण ठेवा. लठ्ठपणा वाढण्याची इतरही अनेक कारणे आहेत. त्यामध्ये खराब जीवनशैलीचा समावेश होतो. कमी शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह, हृदयविकार आणि यकृताच्या समस्यांसारखे अनेक आजार वाढू शकतात. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही मजबूत होते.

आनुवंशिकतेमुळे म्हणजे कौटुंबिक इतिहासामुळेही लठ्ठपणा वाढू शकतो. जर कुटुंबातील कोणीतरी आधी लठ्ठ असेल, तर तुम्हीही लठ्ठ होण्याचा धोका जास्त असतो. अनुवंशिकतेमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू शकते. अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये व्यत्यय येण्याबरोबरच काही औषधे घेतल्याने लठ्ठपणा येतो आणि वजन वाढू शकते.

SCROLL FOR NEXT