Latest

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य ४ ते १० मार्च २०२४

निलेश पोतदार

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : या आठवड्यात तुम्‍हाला चांगला मार्गदर्शक लाभेल. तुम्‍ही आवडीच्‍या कामांमध्‍ये वेळ व्‍यतित कराल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. तुमचे विचार सकारात्‍मक राहतील. तुमच्यासाठी सकारात्मक विचारांनी भारलेला आठवडा ठरणार आहे, असे श्रीगणेश सांगतात.

वृषभ : या आठवड्यात तुम्‍हाला यश लाभेल मात्र आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. तुमचे काम काळजीपूर्वक हाताळावे लागेल. भागीदारीमध्‍ये कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्‍या. तुमची सर्व ऊर्जा परिश्रमांवर केंद्रित कराल; तथापि, विश्रांतीसाठी वेळ काढणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्‍ही सुचवलेले उपाय आणि कामाचे कौतूक होईल.

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला नात्यात खूप सुरक्षित, समाधानी आणि आनंदी वाटेल. सकारात्मक ऊर्जा कायम राहिल. आठवडा आनंदात जाईल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल.

कर्क : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात समाधान आणि सुरक्षित वाटेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीमध्‍ये कटू अनुभव येतील. या आठवड्यात कठोर परिश्रम करावे लागतील.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, हा आठवडा तुमच्यासाठी आरामदायी असेल.जीवनातील प्रत्येक पैलू तुम्हाला आवडेल. तुमचा आत्मविश्वासपूर्ण स्वभाव या आठवड्यात बऱ्याच लोकांना प्रभावित करेल. तुम्हाला तुमच्या व्यवसाय भागीदाराकडून पाठिंबा मिळेल.

कन्या : या आठवड्यात कुटुंबाप्रती जबाबदाऱ्या पार पाडताना जोडीदारासह स्वत:च्या सुधारणेसाठी वेळ कसा काढावा याकडे लक्ष द्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. तुमचे उद्दिष्ट कुटुंबातील सदस्यांना स्‍वावलंबी बनवणे असले पाहिजे. आरोग्याची काळजी घ्‍या. तणावाचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. ॲलर्जी किंवा सर्दीसारखे संसर्गाचा परिणाम होईल.

तुळ : या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्याची चिंता करू नका. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या सुरुवातीला दैनंदिन दिनक्रम सुरुळीत सुरु राहिल; परंतु अखेरीस तुम्‍ही पाळत असलेल्‍या पथ्यांचा कंटाळा येईल; पण शिस्तबद्ध रहा आणि आरोग्याच्या समस्यांपासून स्वतःला वाचवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृश्चिक: श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात भविष्यासाठीच्‍या नियोजनाला प्राधान्‍य द्‍या. व्यवसायात मोठे आव्हान असेल.मात्र वैयक्तिक कारणांमुळे त्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार नाही. एखाद्या विशिष्ट क्लायंटच्या कामात उशीर झाल्यामुळे उद्योगात तुमची प्रतिष्ठा कमी होईल. आरोग्याची काळजी घ्‍या.

धनु : श्रीगणेश सांगतात की, तुमच्‍यासाठी संपूर्ण आठवडा आनंदी राहील. तुम्ही कठोर परिश्रम कराल. याचा खूप समाधानकारक परतावा देईल. आवठड्याचे पहिले तीन दिवस तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्‍ध होतील. शेवटच्या दोन दिवसांत तुम्हाला या संधींची फळे मिळतील. व्यायाम किंवा योगासनांचा दिनचर्येत समाविष्ट करा. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप आनंददायी असेल.

मकर : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला बरे वाटेल, आनंदाची पातळी वाढत जाईल, असे श्रीगणेश सांगतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला घ्या, अन्‍यथा तुम्हाला आर्थिक व्यवस्थापनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

कुंभ: श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात तुम्हाला संघर्षमय परिस्थितींचा सामना करावा लागेल; पण त्याचबरोबर उत्तम शिकण्‍याची संधीही मिळेल. आर्थिक व्‍यवहारावेळी तुमचे खरे शुभचिंतक कोण यातील फरक ओळखता येईल. या आरोग्य चांगले राहिल. मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मीन: श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुमच्यासाठी अनेक संधी येतील, त्यांच्याबद्दल सावधगिरी बाळगा. अतिरिक्‍त कामात व्‍यस्‍त राहाल, अशात आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष द्‍या, तुम्हाला आवश्यक असलेली सर्व मदत तुम्हाला सहज मिळेल.

SCROLL FOR NEXT