Latest

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य २६ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२४

निलेश पोतदार

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : या आठवड्यात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तुमचा कठोर परिश्रमावर भर असेल. त्‍याचबरोबर आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. तुमच्या निर्णयांचे आणि मेहनतीचे प्रियजनांकडून कौतुक होईल. एकुणच हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहपूर्ण आणि अनोख्या अनुभवांनी भरलेला असणार आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सकारात्मकता अनुभवाल, असे श्रीगणेश सांगतात.

वृषभ : या आठवड्यात श्रमाचा योग्‍य मोबदला मिळेल. मात्र यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, असे श्रीगणेश म्‍हणतात तुमचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागेल ज्यात तुमचा बराच वेळ आणि शक्ती लागेल. तुम्ही कठीण परिस्थितीतही आव्हानांचा सामना कराल. आठवड्याच्या शेवटी थकल्यासारखे वाटेल; परंतु तुम्‍ही अधिक अनुभवसंपन्‍न झालेले असाल.

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, हा आठवडा तुमच्‍यासाठी लाभदायक आहे. काळजीपूर्वक निर्णय घेतल्यानंतर तुमच्या वाट्याला येणारे कोणतेही काम तुम्ही परिश्रमपूर्वक कराल. सहनशीलता, संयम आणि स्थिर स्वभाव तुम्‍हाला मदत करेल. मात्र या आठवड्यात तुम्हाला मनासारख्‍या गोष्‍टी घडण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागणार आहेत.

कर्क : या आठवड्यात स्‍मरणीय असेल. तुम्हाला तुमच्या उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्ही प्रसिद्धीसाठी कठोर परिश्रम करत आहात. तुम्ही या आठवड्यात बदलले पाहिजे, ही जाणीव तुमच्यासाठी एक सकारात्मक गोष्ट ठरेल. नाआवडत्‍या कामापासून सुटका होईल. आवडीच्‍या कामात तुम्‍ही वेळ व्‍यतित कराल.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, आरोग्यामध्ये सुधारणा करण्‍यासाठी आठवडा सकारात्‍मक आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. पालकांकडून तुम्‍हाला छान भेट मिळेल. यामुळे तुम्हाला संपूर्ण आठवडा आनंदी वाटेल. तुम्ही कामात व्यस्त राहाल. संयमाच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय वेळेवर साध्य करू शकाल. तुमच्या कामातील समर्पणाचे कौतुक होईल.

कन्या : श्रीगणेश सांगतात की, भविष्याचे चित्र स्पष्ट करण्‍यासाठी कोणत्या गोष्टींचे विश्लेषण आणि विचार करणे आवश्यक आहे. चिंता आणि तणाव या आठवड्याचा एक भाग असू शकतो. मात्र तुम्‍ही संयमाने परिस्‍थिती हाताळून त्‍यावर मात करु शकता. आरोग्‍याची काळजी घ्‍या. व्यावसायिक प्रगतीवर विचार करण्यासाठी तुमच्यासाठी हा एक आदर्श आठवडा ठरेल. जोडीदाराबरोबरचे नाते मधूर होईल.

तूळ : याआठवड्यात तुम्‍ही कामात स्वतःला सिद्ध कराल. एखाद्या प्रकल्प यशस्‍वी झाल्‍याने बढतीची संधीही मिळेल. जोडीदाराच्या भावनांबद्दल संवेदनशील राहण्‍याची आणि त्यांना काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. वादावादी टाळा यामुळे नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचा आरोग्‍यावरही नकारात्मक परिणाम जाणवेल. शांतपणे आणि संयमाने परिस्‍थिती हाताळ्यास त्रास होणार नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधासाठी मार्ग तयार करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीवर अनुकूल असल्‍याने आरोग्य सुधारेल. तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. मेहनतीच्‍या जोरावर आर्थिक यश मिळेल.तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही जितके काम करू शकता तितके पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुमच्याकडे भरपूर सकारात्मक ऊर्जा राहिल.

धनु : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात आत्मविश्वास उंचावल्‍यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल. सहकाऱ्यांकडून तुमच्‍या कामाची प्रशंसा होईल. कृती आणि बोलण्‍यावर नियंत्रण ठेवल्‍यास मतभेद टाळता येतील. तुम्ही यश कसे साजरी करता यावर तुमच्या जोडीदारासाठी हा एक महत्त्वाचा आठवडा असेल. व्यायामाचा फायदा होईल. तुमचे प्रेम जीवन थोडे त्रासदायक असेल. प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवून परिस्थितीवर विचार करणे, ही सर्वात चांगली गोष्ट ठरेल.

मकर : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्‍हाला कोणत्‍याही कामात शॉर्टकट घेणे फायदेशीर ठरणार नाही. तुम्हाला अनेक अडथळे येतील. कामाच्या बाबतीत या आठवड्यात ग्रहमान तुमच्‍या बाजूने नाही. मात्र परिस्‍थितीसमोर घाबरून जावू नका, अन्‍यथा परिस्थिती आणखी वाईट होईल. तुमचे आरोग्य चांगले राहिल. तुम्‍हीही निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रीत कराल.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्‍ही त्‍या यशस्‍वीपणे पूर्ण कराल. प्रकृतीची काळजी घ्‍या. आहार आणि विश्रांती याबाबतीत नियमित वेळापत्रक ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. एक छोटी सुट्टी तुम्हाला आनंद देईल. याचा परिणाम आरोग्‍यावर सकारात्‍मक होईल.

मीन : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात थकवा आणि निराशा वरचढ ठरेल. योग आणि ध्‍यान याची मदत घ्‍या. तुमचे छंद जोपासत सकारात्मक वृत्ती ठेवा. तुमच्या सर्व इच्छा प्रयत्नांनी पूर्ण होतील. फसवणूक टाळण्‍यासाठी स्वतःवर विश्‍वास ठेवा, इतरांवर कमी अवलंबून राहा. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकणार नाही परंतु तुम्हाला या आठवड्यात मिळणारी प्रसिद्धी आणि ओळख अर्थपूर्ण ठरणारी असेल.

SCROLL FOR NEXT