Latest

Weather Update : गार वार्‍यांमुळे राज्यात पारा घसरला

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातून येणारे शीतवारे अन् बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वार्‍यांची राज्यावर टक्कर होत असल्याने पहाटे व रात्री गार वारे सुटले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातही कमाल तापमानात 3 ते 4 अंशांची घट झाली आहे. मंगळवारी सोलापूरचा पारा राज्यात सर्वाधिक 36.8 अंशांवर गेला होता. उत्तर भारतात अजूनही हवेच्या वरच्या थरात वार्‍याचा वेग जास्त आहे. तसेच बंगालच्या उपसागरात प्रतिचक्रवाताचा प्रभाव अजूनही असल्यामुळे या दोन्ही वार्‍यांची टक्कर महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांतील कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT