Latest

Weather Update : राज्यात आजपासून हलक्या पावसाची शक्यता

Laxman Dhenge

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्या भागात पश्चिमी चक्रवाताचा जोर कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तामिळनाडू किनारपट्टी ते मराठवाडा व विदर्भावर हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात शुक्रवारी व शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. यातही विदर्भात पावसाचा जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे. तेथे 9 ते 14 अशा पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

असा आहे अंदाज

  • मध्य महाराष्ट्र : 10 व 11 फेब्रुवारी
  • मराठवाडा : 10 व 11 फेब्रुवारी
  • विदर्भ : 10 ते 14 फेब्रुवारी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT