Latest

Weather In India | पुढील २४ तासांत उत्तरेत थंडी तर दक्षिणेत पावसाचा अलर्ट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडी दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात ढगाळ वातावरण असून अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार, पुढील २४ तासांत उत्तर भारतात तीव्र थंडी तर वायव्य, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. (Weather In India)

दरम्यान, भारताच्या दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पावसाच्या प्रमाणत लक्षणीय घट होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिली आहे. (Weather In India)

Weather In India : उत्तरेत १३ जानेवारीपर्यंत 'शीतलहरी'

IMD ने दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांसाठी ९ जानेवारी रोजी 'थंडी' ते 'तीव्र थंडी' दिवसाची इशारा जारी केला आहे. शिवाय, राजस्थानमध्ये उद्यापर्यंत थंडी राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी १२ जानेवारी ते १३ जानेवारीपर्यंत 'थंडीची लाटेची' परिस्थिती असल्याचे IMD च्या अहवालात म्हटले आहे. (Weather In India)

दिल्लीत महिन्यातील सर्वात थंड दिवस आज नोंदवला

पुढील पाच दिवसांत उत्तरेकडील तापमानात कोणतेही लक्षणीय बदल होणार नसल्याचे IMD ने म्हटले आहे. दरम्यान दिल्लीने आज (दि.९) महिन्यातील सर्वात थंड दिवस नोंदवला, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. सोमवारी (दि.८) तापमानाचा पारा ५.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने राष्ट्रीय राजधानीतील तापमान नैनितालच्या थंडी ऐवढे झाले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT