Latest

Weather Forecast | पुढील ४ दिवसांत राज्यातील ‘या’ भागांत पावसाची शक्यता

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सून उत्तराखंड, उत्तर प्रदेशात आणि मध्य प्रदेशातील (Weather Forecast) काही भागांतून माघारी परतला आहे. अद्याप महाराष्ट्रात परतीचा पाऊस आलेला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे. पण पुढील ४ दिवस राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, ईशान्य राजस्थान आणि आजूबाजूच्या भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रावात असून दुसरे ईशान्य अरबी समुद्रापासून ते गुजरातच्या उत्तर-पूर्व राजस्थानपर्यंत तयार झाले आहे. आणखी एक टर्फ रेषा केरळ पासून मराठवाड्यातून कर्नाटक पर्यंत तयार झाली आहे. तर नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावर आणि उत्तर श्रीलंकेच्या किनार्‍यालगत चक्रीवादळाचे परिवलन आहे. पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तसेच उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्व भागात आज (दि.१०) मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि पूर्व राजस्थानमध्ये पुढील २ दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत तामिळनाडू आणि रायलसीमा आणि पुढील २४ तासांत आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather Forecast)

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT