Latest

वेट लॉस करायचे आहे ? चिकूच्या सेवनाने सहज करा वेट लॉस

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळ्याचा सीझन सुरू झाला की बाजारात वेगवेगळ्या फळांची रेलचेल होऊ लागते. मुळातच आरोग्यासाठी अत्यंत उत्तम ऋतू म्हणून हिवाळ्याकडे पाहिलं जातं. या दिवसांत अतिरिक्त वजन कमी करून शरीर सुदृढ करण्याकडे अनेकांचा कल असतो.  तुम्हीही असा विचार करत असाल तर चिकू हे फळ वेट लॉससाठी अत्यंत उपयुक्त आहे. चिकूत साखरेच प्रमाण असल्याने अनेकजण वेट लॉस करण्यासाठी ते टाळताना दिसतात.

पण तुम्हाला माहिती आहे का ? वेट लॉसमध्ये चिकू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीराच्या मांसपेशीना मजबूती देणारे घटक चिकूमध्ये मोठ्याप्रमाणावर असतात. त्यामुळे रोज एक्सरसाईज करत असाल तर चिकूचे सेवन आवर्जून करा.

चयापचय क्रिया सुधारण्यात चिकू मोठ्याप्रमाणावर भूमिका बजावतो.

आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेत असाल तर चिकूचे सेवन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. कारण चिकूमध्ये ग्लुकोज आणि विटामीनचे प्रमाण पुरेसे असते. त्यामुळे रिकव्हरीची प्रकिया जलद होण्यास मदत होते.

मानासिक ताण तनाव असतील तर चिकूचा समावेश दैनंदिन आहारात करण्याचा सल्ला तज्ञ नेहमी देतात.

चिकूमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बद्धकोष्ठ सतावत असेल तर चिकूचे सेवन आवर्जून करावं.

अनिमिया असलेल्या लोकांसाठी चिकू वरदान आहे. चिकू हिमोग्लोबिन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

लहान मुलांना चिकू दिल्याने मेंदू आणि मांसपेशींचा विकास वेगाने होण्यास मदत होते. पण मुलांना पूर्णपणे मॅश करूनच चिकू द्यावा.

चिकूमध्ये विटामीन ए मोठ्याप्रमाणावर असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चिकूचे सेवन आवर्जून करावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT