Latest

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची सौजन्य भेट घेणार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : आज मी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना भेटणार आहे, ते माझे राजकीय मित्र आहेत. मी चेन्नईला जात असल्याने ही एक सौजन्य भेट आहे. जेव्हा जेव्हा दोन राजकीय व्यक्ती भेटतात तेव्हा संबंधित गोष्टींवर चर्चा होते, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एएनआयला सांगितले आहे. यावेळी त्या सीएए तसेच मोरबी दुर्घटनेबाबत बोलल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीएएबाबत म्हणाल्या, आम्ही याच्या पूर्णपणे विरोधात आहोत आणि आमचा सीएएला विरोध आहे, गुजरात निवडणुकीमुळे ते हा खेळ खेळत आहेत.

राजकारणापेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे असल्याने मी मोरबी दुर्घटनेवर भाष्य करणार नाही. मी माझ्या संवेदना व्यक्त करते. अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक अजूनही बेपत्ता आहेत. मोरबी घटनेच्या चौकशीसाठी SC अंतर्गत न्यायिक आयोग बनवावा, असे #MorbiBridgeCollapse वर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, मोरबी घटनेतील गुन्हेगारांवर ईडी आणि सीबीआय कारवाई का करत आहेत? ते फक्त सामान्य लोकांवर कारवाई करतात. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे…मी पंतप्रधानांबद्दल काहीही बोलणार नाही कारण ते त्यांचे राज्य आहे…मी राजकारणावर काहीही बोलणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एएनआयला म्हटले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT