Latest

Lok Sabha Election 2024 : नक्षली भागात दोन दशकांनी होणार मतदान

दिनेश चोरगे

दोन दशकानंतर झारखंडमधील सिंहभूम या नक्षलग्रस्त मतदार संघामध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आशिया खंडातील सर्वात घनदाट सारंडा जंगल या मतदार संघात आहे. येथील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी या दुर्गम भागामध्ये 118 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांना व मतदान साहित्य येथे हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पोहोचविण्यात येणार आहे.

सिंहभूम मतदार संघातील काही भाग नक्षलग्रस्त आहे. गेल्याच वर्षी येथे माओवादाशी संबंधित हिंसाचारात 22 जणांचा मृत्यू झाला होता. रोबोकेरा, बिंज, थळकोबाद, जराइकेला, रोम, रेंगराहटू, हंसाबेडा आणि छोटानगर यांसारख्या दुर्गम ठिकाणी 118 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. या भागात रेल्वेने 121 निवडणूक पथके पाठवण्यातआली आहेत.

SCROLL FOR NEXT