Latest

आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

दिनेश चोरगे

रेकजॉव्हिक; वृत्तसंस्था : आईसलँडमधील गिंडाविकमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागात सोमवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. वोल्कोनो ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी ग्रिंडाविकमध्ये एक महिन्यापूर्वी हजारो भूकंपाची नोंद झाली असल्याची माहिती आईसलँडच्या हवामाने विभागाने दिली आहे.

ग्रिंडाविकमध्ये भूस्खलन झाल्याने सुमारे 3.5 किलोमीटर लांब भेगा पडल्या असून यामध्ये वेगाने वाढ होत आहे. ग्रिंडाविकपासून आईसलँडची राजधानी रेकजॉव्हिक केवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे. भेगांतून लाव्हा रस 100 ते 200 चौरस मीटर प्रतिसेेकंदाने वेगाने वाहत आहे. या परिसराच्या जवळ जाण्यापासून दूर राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. भूकंपानंतर ग्रिंडाविकमधील सुमारे 4 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT