Latest

ब्रिटिश पंतप्रधानांच्या भेटीने भारावला विवेक ओबेरॉय

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतल्यानंतर या निमंत्रण व सन्मानाबद्दल त्यांचे आभार मानले. सुनक यांच्या भेटीनंतर विवेक ओबेरॉय याने त्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. इंग्लंडमध्ये सध्या यूके-इंडिया वीक साजरा केला जात असून, यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील भारतीय व्यक्तींना निमंत्रित केले गेले आहे.

'10 डाऊनिंग स्ट्रीटवर आयोजित या शाही सोहळ्याला निमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान ऋषी सुनक यांचा मनापासून आभारी आहे. भारत-इंग्लंडमधील स्नेहसंबंध मजबूत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न, त्यांची तळमळ लक्षवेधी आहे. या दोन्ही महान देशांना एकमेकांना जोडण्यासाठी आपण सचेतन सेतू आहोत, ही त्यांची भावना प्रेरणादायी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ते पंतप्रधान मोदीजी असा करतात, ते मला खास भावते. हीच भारतीय संस्कृती व संस्काराची शिकवण आहे, याचे प्रतिबिंब यातून उमटत', असे विवेक ओबेरॉय याप्रसंगी म्हणाला. विवेक ओबेरॉय समवेत यावेळी अभिनेत्री सोनम कपूर देखील उपस्थित होती.

SCROLL FOR NEXT