Latest

Virat’s 50th century : ‘जोडीदाराच्या पाठिंब्याशिवाय…’ : विराटसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने  मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आपले 50 वे वनडे शतक झळकावून इतिहास रचला. वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने हा भीम पराक्रम केला.  त्याने सचिन तेंडुलकरला (49 वनडे शतक) मागे टाकून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या कामगिरीबद्दल विराटवर काैतुकाचा वर्षाव हाेत आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही कोहलीच्या कामगिरी नंतर पोस्ट करत म्हटलं आहे, "जोडीदाराच्या पाठिंब्याशिवाय कोणीही असे टप्पे गाठू शकत नाही". (Virat's 50th century)

Virat's 50th century : जोडीदाराच्या पाठिंब्याशिवाय…

अभिनेता रितेश देशमुखने आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "जर तुम्हाला कधीही परिपूर्ण कृपा, दर्जा आणि नम्रता यांचे परिपूर्ण संयोजन पाहायचे असेल तर ते आहे किंग कोहली. त्याने  50 वे शतक पार केले.  पुढे  म्हटलं आहे की, तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याशिवाय कोणीही असे टप्पे गाठू शकत नाही. विराट आणि अनुष्काचे खूप अभिनंदन."

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा आणि विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोन्ही जोड्या त्यांच्या नात्यांसाठी खूप चर्चेल्य़ा जातात. हे चौघेही आपल्या सोशल मीडियावर आपले नातेसंबध दृढ असणारे  फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. विराट आणि अनुष्का त्यांच्या चाहते वर्गात विरुष्का म्हणुन ओळखले जातात.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू

50 : विराट कोहली
49 : सचिन तेंडुलकर
31 : रोहित शर्मा
30 : रिकी पाँटिंग
28 : सनथ जयसूर्या

दरम्यान, कोहलीने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वचषकातील मोठा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकर (673), मॅथ्यू हेडन (659) आणि रोहित शर्मा यांना एकादमात मागे टाकले. विराटने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक 80 धावा करत हा विक्रम रचला.

Virat's 50th century : काय आहे रेकॉर्ड?

मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळताना विराट कोहलीने आणखी एक विक्रम केला. विश्वचषक स्पर्धेत 600 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. 2003 च्या विश्वचषकात भारत उपविजेता असताना सचिन तेंडुलकरने एकूण 673 तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 648 धावा केल्या होत्या. आता या यादीत विराट कोहलीही सामील झाला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT