Latest

Virat Kohli : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उतरताच विराट कोहलीचा नवा विक्रम! गांगुलीशी केली बरोबरी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) भारतात आपली 50 वी कसोटी खेळत आहे. अशी कामगिरी करणारा तो 13वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.

कोहलीच्या (Virat Kohli) आधी चेतेश्वर पुजाराने नुकतीच भारतात 50 वी कसोटी खेळली. भारतात सर्वाधिक 94 कसोटी खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. राहुल द्रविड, सुनील गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे हे या यादीतील टॉप 5 खेळाडूंमध्ये आहेत.

कोहलीचे भारतातील रेकॉर्ड उत्कृष्ट (Virat Kohli)

राहुल द्रविड (70) हा सचिननंतर भारतात सर्वाधिक कसोटी खेळला आहे. गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळेने भारतात 63 कसोटी सामने खेळले आहेत. कपिल देव यांनीही भारतात 65 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीने भारतात 76 डावांमध्ये 58.20 च्या सरासरीने 3,958 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 13 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

भारतासाठी मायदेशात सर्वाधिक कसोटी खेळलेले खेळाडू

सचिन तेंडुलकर – 94
राहुल द्रविड – 70
सुनील गावस्कर – 65
कपिल देव – 65
अनिल कुंबळे – 63
व्हीव्हीएस लक्ष्मण – 57
आर अश्विन – 55*
हरभजन सिंग – 55
दिलीप वेंगसरकर – 54
वीरेंद्र सेहवाग – 52
चेतेश्वर पुजारा – 51
सौरव गांगुली – 50
विराट कोहली – 50*

SCROLL FOR NEXT